टेककार्डिया म्हणजे हृदयाची असामान्य गती ज्यामध्ये हृदयाचे ठोके वेगाने पडतात. सामान्यपणे हृदयाचे मिनिटाला 60 ते 100 ठोके पडतात. टेककार्डिया विकाराने त्रस्त असाल तर हृदयाच्या वरच्या आणि खालच्या बाजूमध्ये गती आपोआप वाढते. टेककार्डिया ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया असते. अनेकदा चिंता, ताप आणि रक्त वाहणे आणि थकवा येणारे व्यायाम केल्यास हृदयाची गती वाढते.
त्याचबरोबर काही आजारांमुळेही टेककार्डियाची समस्या निर्माण होते. जसे थायरॉईड, हायपरथायरॉईड. अनेकदा रुग्णाला निमोनिया असल्याने श्वास घेणे अवघड होते. त्यामुळेही टेककार्डियाची तक्रार जाणवते. याखेरीज चहा, कॉफी, चॉकलेट आणि अल्कोहोल या गोष्टीही टेककार्डियाला कारणीभूत ठरतात.
जन्मापासून हृदयाच्या समस्या असणे, हृदयासंबंधी आजार असणे, उच्च रक्तदाब, धूम्रपान, ताप येणे, मद्यपान, कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन, औषधाचे दुष्परिणाम, धमन्यांच्या आजारामुळे हृदयाच्या स्नायूंमध्ये दूषित रक्त वाहणे, हार्ट फेल होणे, कार्डियोमियोपॅथी, ट्यूमर, संसर्ग इत्यादी कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता असते.
चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, थकवा येणे, हृदयाची गती वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे
तापामुळे होणारा टेककार्डिया हा ताप कमी करणार्या औषधांच्या मदतीने कमी करता येतो.
अनेकदा अतिरक्त स्रावामुळे रुग्णाच्या हृदयाची गती वाढते. या परिस्थितीत सर्वात पहिले काम म्हणजे रुग्णाची अवस्था स्थिर करण्याची गरज असते. रुग्णाचा रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर टेककार्डियाच्या समस्येपासूनही सुटका होते.
हायपर थायरॉईडिझम : यामध्ये रुग्णाला थकवा आणि चिंता वाटत असते. त्यामुळे हृदयाची गती वाढते. अशा वेळी औषधांच्या मदतीने थायरॉईड नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात. परिस्थिती अधिक बिघडल्यास रेडिओअॅक्टिव्ह आयोडीन, रेडिएशनच्या मदतीने उपचार केले जातात.
मूत्रपिंडाची समस्या : मूत्रपिंडामध्ये रक्ताच्या गुठळ्या होत असल्याने टेककार्डिची समस्या निर्माण होत असेल तर डॉक्टर पहिल्यांदा या गुठळ्या कमी करण्याचे प्रयत्न करतात. अनेकदा निमोनिया आणि मूत्रपिंडाचे विकार असले की टेककार्डियाची समस्या भेडसावते.