आरोग्य

चेस्ट फिजिओथेरेपीचा पर्याय

Arun Patil

चेस्ट फिजिओथेरेपी म्हणजे काय?

कोरोनावर मात करताना औषधांबरोबरच चेस्ट फिजिओथेरेपी देखील महत्त्वाची आहे. या थेरेपीचा थेट संबंध हा श्‍वसनप्रक्रियेशी जोडलेला आहे. अशावेळी सर्वजण चेस्ट फिजिओथेरेपीच्या मदतीने फुप्फुसाला आणखी मजबूत करून कोरोनावर सहजपणे मात करू शकतो. या आधारे श्‍वास घेण्याच्या क्षमतेत सुधारणा करण्यासाठी मदत मिळते. एक ट्रिटमेंट सेशन 20 ते 40 मिनिटांपर्यंत चालते. या थेरेपीच्या मदतीने फुप्फुसातील कफ कमी करता येतो.

चेस्ट फिजिओथेरेपीचे लाभ

यात पोश्‍चरल ड्रेनेज, चेस्ट परक्यूजन, चेस्ट व्हायब्रेशन, टर्निंग, डीप ब्रिदिंग एक्सरसाईज यासारख्या अनेक थेरेपीचा समावेश असतो. या मदतीने फुप्फुसात कफ बाहेर येण्यासाठी मदत मिळते. रुग्णांना वेगवेगळ्या अँगलमध्ये झोपवून दीर्घ श्‍वास घेणे आणि सोडण्यास सांगितले जाते. रुग्णाची पाठ, छातीच्या बरगड्यांवर थापा मारून कंपन तयार केले जाते. त्यामुळे फुप्फुसातील कफ बाहेर पडण्यास मदत मिळते.

चेस्ट फिजिओथेरेपी कशी करावी?

कंपिंग आणि व्हायब्रेशन : ही थेरेपी दोन-तीन मिनिटांत करता येऊ शकते. ही थेरेपी झोपून किंवा आरामात कोणाचाही आधार घेत करता येतेे. चेस्टवर व्हायब्रेशन देण्यासाठी काही माईल्ड व्हायब्रेशन उपकरणांचा आधार घेतला जातो. जसे की ट्रिमर.

दीर्घ श्‍वास घेण्याचा व्यायाम : पहिल्या टप्प्यामध्ये आपण आरामात दीर्घ श्‍वासाच्या मदतीने श्‍लेष्मा (बलगम) एकत्र करू शकतो.

टफिंग आणि हफिंग टेक्निक्स

या कृतीतून फुप्फुसातून कफ बाहेर काढण्यास मदत मिळते. फुप्फुसातून कफ बाहेर येण्यासाठी एक पोस्टुरल ड्रेनेज असतो. ठराविक काळानंतर हे आसन करता येते. पालथे झोपलेले असताना शरीराच्या दोन्ही बाजूंना आलटून पालटून झोपूनही थेरेपी करता येते.

थेरेपीशी निगडीत विशेष गोष्टी

चेस्ट फिजिओथेरेपी ही जेवणापूर्वी किंवा जेवण केल्यानंतर दोन तासांनी करणे हिताचे ठरेल. या काळात थेरेपी करताना उलटी होण्याची शक्यता राहत नाही.

ही थेरेपी एखाद्या मालिकेप्रमाणे म्हणजे सायकलप्रमाणे करायला हवी.

फुप्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी एका काळात थेरेपीच्या दोन ते तीन सायकल करण्याची गरज आहे. वाफेबरोबर ही थेरेपी केल्याने कफ आणि स्राव कमी करता येतो.

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत पीडित रुग्णांना सर्वाधिक त्रास हा श्‍वसनाचा झाला. एवढेच नाही, तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना देखील काही काळ हा त्रास राहू शकतो. श्‍वास घेण्यास त्रास होणे हे एक संसर्गाचे प्रमुख लक्षण आहे.

अपुर्‍या ऑक्सिजनमुळे फुप्फुसाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन कोरोना रुग्ण हा गंभीर अवस्थेत गेल्याच्या घटना घडल्या आहेत. जीवघेण्या कोरोनातून मुक्‍ती मिळण्यासाठी औषध घेण्याबरोबरच व्यायामाचीदेखील तेवढीच आवश्यकता आहे.

डॉ. संजय गायकवाड

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT