आरोग्य

इन्श्युलिन प्रतिरोधामुळे वाढतो स्ट्रोकचा धोका

Arun Patil

लंडन : युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटिजच्या वार्षिक बैठकीत 'टाईप-2' मधुमेहाशी संबंधित एक लाखापेक्षा अधिक लोकांच्या एका पाहणीतून काढलेले निष्कर्ष सादर करण्यात आले. त्यामध्ये असे सांगण्यात आले की इन्शुलिन प्रतिरोधामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

इन्शुलिनमुळे रक्तातील शर्करेचे म्हणजेच साखरेचे रूपांतर ऊर्जेत होत असते. ज्यावेळी पेशी इन्शुलिनसाठी चांगल्याप्रकारे काम करीत नाहीत आणि सहजपणे रक्तातून शर्करा (ग्लुकोज) घेत नाहीत त्यावेळी या स्थितीला 'इन्शुलिन प्रतिरोध' असे म्हटले जाते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत राहते.

टाईप-2 मधुमेहाचे स्वरूप व्यक्तिगणिक वेगवेगळे असते. इन्शुलिन प्रतिरोध जितके अधिक असेल तितका स्ट्रोकचा धोकाही अधिक असतो. स्वीडनमधील करोलिन्स्का इन्स्टिट्यूट गोथेनबर्ग विद्यापीठ आणि राष्ट्रीय मधुमेह रजिस्ट्रीच्या एका संयुक्त पथकाने याबाबतची एक पाहणी केली होती.

सर्वात कमी इन्शुलिन प्रतिरोध असलेल्या लोकांमध्ये उच्च इन्शुलिन प्रतिरोध असलेल्या लोकांच्या तुलनेत स्ट्रोकचा धोका 40 टक्के कमी असल्याचे दिसून आले. उच्च इन्शुलिन प्रतिरोध असल्यावर स्ट्रोकनंतर मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT