आरोग्य

पायरियाचा आजार आणि दातांचे आरोग्य, अशी घ्या काळजी…

backup backup

आरोग्याची काळजी शरीराबरोबर मुखारोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. दिवसातून केवळ एकदा दात घासणे म्हणजे मुखारोग्याची काळजी घेणे असा होत नाही. मुखारोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे; अन्यथा त्रास वाढू शकतो. पेरियोडोन्टायटिस किंवा पायरिया हा तोंडाचा आजार आहे ज्याचा वेळीच इलाज न झाल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येमध्ये हिरड्यांचा आतला स्तर आणि हाडे, दात आणि दाताच्या खाचांपासून लांब जातात त्यामुळे दोन दातांच्या मध्ये खड्ड्यासारखे दिसते. त्यामुळे तिथे संसर्ग करणा-या जीवाणूंची निर्मिती होते. या संसर्गामुळे दात किडतात आणि त्यामुळे रक्त येते आणि तोंडाचा घाण वास येतो. एवढेच नव्हे तर संसर्ग वाढल्यास हिरड्यांतून रक्त येणे आणि पू येणे हा त्रासही जाणवतो.

पायरियाची लक्षणे: दातांची ही समस्या एक दिवसांत वाढत नाही तसेच त्याची लक्षणे एक दिवसात दिसून येत नाहीत. एकदा लक्षणे दिसू लागली की ही समस्या वाढते. याचे मुख्य लक्षण म्हणजे दातांमध्ये वेदना, रक्त येणे, हिरड्यांना सूज, दातांमध्ये अंतर पडणे किंवा दात हालणे, दात आणि हिरड्या यांच्यामध्ये जागा निर्माण होणे, दातांवर हिरव्या, पिवळ्या किंवा काळ्या, करड्या रंगाचा स्तर जमा होणे, तसेच हिरड्या सुरकुतणे आदी लक्षणे दिसतात.

पायरियाची कारणे : तज्ज्ञांच्या मते दात किंवा हिरड्यांशी निगडित तक्रारींचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. पायोरियाच्या संदर्भात वेदना सुरु होण्यामागे काही कारणे आहेत.

* तोंडाची स्वच्छता नीट नसणे
* दातामध्ये अन्नकण अडकणे
* योग्य पद्धतीने दात न घासणे किंवा खूप कडक ब्रश वापरणे.
* दात किडणे
* सतत टूथपेस्ट बदलणे
* गुटखा, तंबाखू, सिगरेट, दारू, पान, सुपारी यांचे व्यसन
* दात टोकदार वस्तूने कोरणे
* पोटाच्या वारंवार समस्या
* हार्मोनल चेंजेस
* अनुवांशिक कारणे
* ऑटोइम्यून समस्या

उपचार काय?

* या समस्येपासून बचाव करण्याची योग्य पद्धती म्हणजे मुखारोग्याकडे लक्ष देणे. त्यासाठी दिवसातून कमीत कमी दोन वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा. नियमितपणे दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. दातांना नुकसानकारक कोणत्याही गोष्टीपासून दूर राहावे जसे गुटखा, तंबाखू, दारू, सिगारेट, सुपारी, कोल्डड्रिंक इत्यादी. दंतआरोग्याविषयी अनुवांशिकता असेल तर वेळीच सतर्क राहावे.

* या त्रासासाठी दातांच्या स्वच्छतेबरोबरच स्केलिंग, रुट प्लानिंग तसेच औषधांचाही वापर केला जातो. जर स्थिती गंभीर असेल तर शस्त्रक्रियेचाही पर्याय आहे. त्याशिवाय उपचारादरम्यान आणि नंतरही मुखारोग्याची काळजी घेण्याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.

– डॉ. निखिल देशमुख, दंतवैद्य

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT