Adolescent Mental Health Alert: आजची तरुण पिढी मानसिक आरोग्याच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. नवीन आंतरराष्ट्रीय अहवालानुसार 13 ते 17 वर्षे वयोगटातील मुलं आणि विशेषत: मुली मानसिकदृष्ट्या अधिक त्रस्त दिसत आहेत. हा अभ्यास अमेरिकेतील आणि भारतातील सुमारे 10,000 पेक्षा जास्त किशोरवयीन मुलांवर करण्यात आला असून त्यातून अत्यंत चिंताजनक माहिती पुढे आली आहे.
Global Mind Project च्या अभ्यासात असे दिसून आले की, आजची किशोरवयीन पिढी आधीपेक्षा जास्त दुःखी, तणावग्रस्त आणि रागीट होत चालली आहे. मुलींची परिस्थिती तर विशेष गंभीर आहे. दहा पैकी सहा मुली मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत.
या वयोगटातील मुलांमध्ये दिसणाऱ्या समस्या:
• नेहमी राग येणे आणि इतरांवर चिडचिड करणे
• आक्रमक वर्तन
• मनात विचित्र, अनैच्छिक विचार येणे
• काही वेळा वास्तवापासून दूर गेल्यासारखे वाटणे
• भीती आणि असुरक्षितता वाटणे
विशेष म्हणजे, एकटेपणाची भावना तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे.
या संशोधनात एक धक्कादायक बाब पुढे आली की, 65% किशोरवयीन मुली मानसिकदृष्ट्या त्रस्त आहेत. यामुळे त्यांचा अभ्यास, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन वागणुकीवर मोठा परिणाम होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, आजची मुले खूप लवकर मोबाईल वापरायला लागतात. इंटरनेट, गेम्स, सोशल मीडिया यामुळे
• अपुरी झोप होते
• मनावर माहितीचा ताण वाढतो
• तुलना, ट्रोलिंग आणि बॉडी-शेमिंगला सामोरे जावे लागते
• हिंसक कंटेंटमुळे वर्तनात आक्रमकता वाढते
स्क्रीनवरचं जग आणि खऱ्या आयुष्यातील अपेक्षा यांच्यातील संघर्ष मुलांच्या मनात सुरु होतो.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी पालक, शाळा आणि सरकारला त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
त्यांच्या मते —
• मुलांना स्मार्टफोन देण्याचे वय वाढवावे
• स्क्रीन टाइमवर मर्यादा आणावी
• भावनिक संवाद वाढवावा
• शाळांमध्ये मानसिक आरोग्यावर भर द्यावा
• मुलांच्या वर्तनातील बदल लगेच लक्षात घेतल्यास गंभीर संकट टाळता येत.
या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की स्मार्टफोनचा वाढता वापर, झोपेची कमतरता आणि डिजिटल ताण या गोष्टी किशोरवयीनांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात. संशोधकांच्या मते, ही समस्या वाढण्याआधीच पालक, शाळा आणि शासन यांनी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.