आजची तरुण पिढी म्हणजेच मिलेनियल्स आणि जनरेशन Z आता आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागली आहे. पार्टी असो किंवा गेट-टुगेदर, आता हे लोक अल्कोहोलऐवजी नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्स किंवा लो-अल्कोहोल मॉकटेल्स पिण्याकडे जास्त कल दाखवत आहेत.
निल्सेनIQच्या एका सर्व्हेनुसार, भारतातील ३४% ग्राहक आता पूर्णपणे अल्कोहोल न पिण्याचा किंवा कमी अल्कोहोल घेण्याचा पर्याय निवडतात. हा आकडा जगातील सरासरीपेक्षा दुप्पट आहे. यातील निम्म्याहून अधिक लोक हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत.
तरुणाई आता फिटनेस, हेल्दी आहार आणि मेंटल हेल्थवर जास्त लक्ष देते आहे. त्यामुळे मद्यपान कमी करण्याचा निर्णय घेतला जातो. यामुळे झोप नीट होते, शरीरावर वाईट परिणाम होत नाही आणि दुसऱ्या दिवशी कामात अडथळा येत नाही.
भारतातील ५४% लोक म्हणतात की त्यांना अल्कोहोल नको किंवा अगदी थोडे चालेल.
उत्तर भारतात हा आकडा ५४%, पश्चिम भारतात ४३% आणि दक्षिणेत ३७% आहे.
१८ ते ३४ वयोगटातील तब्बल ५३% लोकांनी मद्यपान कमी केले आहे.
५५ वर्षांवरील लोकांमध्ये हा आकडा फक्त १३% आहे.
तरुण पिढी आता रंगीत, चविष्ट आणि हेल्दी मॉकटेल्स पसंत करते. नॉन-अल्कोहोलिक बिअर, ज्यूस बेस्ड कॉकटेल्स, फ्लेवर्ड सोडा हे नवीन पर्याय लोकप्रिय होत आहेत.
या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या नवीन फ्लेवर्स, झिरो अल्कोहोल बिअर, हेल्दी मॉकटेल्स मार्केटमध्ये आणत आहेत. यामुळे फूड आणि ड्रिंक इंडस्ट्रीत नवा बिझनेस निर्माण झाला आहे.
मद्यपान कमी झाल्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम कमी होतात, अपघाताचे प्रमाण घटते आणि घरातील वातावरणही शांत राहते.
तरुणाई आता केवळ मजेसाठी नाही तर स्वतःच्या आरोग्यासाठी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. मॉकटेल्स आणि नॉन-अल्कोहोलिक पेये आता पार्टीमध्ये नवा ट्रेंड बनले आहेत. भविष्यात हा ट्रेंड अजून वाढेल असे तज्ज्ञ सांगतात.