World No Tobacco Day 2025 : धुम्रपान आणि तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम हा केवळ जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी चर्चा करण्याचा विषय नाही. त्यामुळेच धुम्रपान आणि तंबाखू व्यसनाविरोधात शासनाकडून विविध पातळीवर धाेक्याच्या सूचना देण्याचा प्रयत्न केला जाताे. आता सिगारेटमुळे केवळ तुमच्या फुफ्फुसांवरच नव्हे तर पुरुष आणि महिला दोघांच्याही प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, असे संशोधनात स्पष्ट झाले आहे. तरुणाईने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारणा आजची तरुणाई भविष्यात पालक होणार आहेत.
मागील काही वर्षांमध्ये पुरुषांबराेबरच महिलांमध्येही धुम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. सिगारेट ओढल्याने तुमच्या फुफ्फुसांवरच नव्हे तर पुरुष आणि महिला दोघांच्याही प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. डॉक्टर म्हणतात की, तुम्ही आत्ताच सिगारेट ओढणे सोडले तर केवळ फुफ्फुस किंवा हृदयासाठी नव्हे तर आई किंवा वडील होण्याची तुमची क्षमता देखील कमकुवत हाेवू शकते. धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो.
एखादी महिला धूम्रपान करत असेल तर तिच्या शरीरातील बदल योग्यरित्या होत नाहीत. स्त्री बीज योग्यरित्या तयार होत नाहीत. यामुळे गर्भधारणा कठीण होते. धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये गर्भपात किंवा अकाली बाळंतपणाचा धोका देखील वाढतो, असेही डॉक्टर सांगतात.
धूम्रपानामुळे पुरुषांमध्ये शुक्राणू कमी होऊ शकतात. तसच ते कमकुवत होऊ शकतात . यामुळे स्त्रीच्या अंडकोषापर्यंत पोहोचणे आणि पत्नीला गर्भधारणा कठीण होते. म्हणूनच तुम्हाला भविष्यात निरोगी बाळ हवे असेल तर धूम्रपान सोडणे हे अनिवार्य ठरते. हे तुमच्या आराेग्याबराेबर तुमच्या बाळासाठी फायदेशीर ठरेल, असा सल्ला धुम्रपानाचे व्यसन असणार्यांना डाॅक्टर देतात.
डॉक्टर म्हणतात की , तुम्हाला भविष्यात मूल हवे असेल तर सर्वोत्तम पाऊल म्हणजे तत्काळ धूम्रपान सोडणे. महिला किंवा पुरुष या दाेघांनीही धूम्रपान सोडल्यास त्यांचे आरोग्य आणि प्रजनन क्षमता दोन्ही सुधारते. व्यसनातून मुक्त झाल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्हाला आराेग्याचे लाभ मिळतात. महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता वाढवते. पुरुषांमध्ये अधिक आणि मजबूत शुक्राणू तयार करण्यास मदत हाेते. यामुळे दाम्पत्यांना मूल होण्याची शक्यता वाढते.