हिवाळा सुरु झाला की शरीराला आतून ऊब देणाऱ्या आणि पचन सुधारण्यास मदत करणाऱ्या पदार्थांची गरज वाढते. थंडीत अनेकांना थकवा, त्वचा कोरडी पडणे, पोटफुगी किंवा मंद पचन अशी समस्या जाणवते. अशा वेळी घरच्या किचनमध्ये बनवता येणारे एक साधे व्हेजिटेबल सूप शरीराला आवश्यक उष्णता देतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यात मदत करतो. या सूपमध्ये असलेले जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट आणि खनिजे हिवाळ्यातील पोषणाची गरज सहज पूर्ण करतात.
भारतीय घरात सहज मिळणाऱ्या गाजर, पालक, टोमॅटो, लसूण, आले आणि कांदा यांच सूप तयार केल तर ते शरीराला आवश्यक ऊर्जा देते. गाजर आणि पालक व्हिटॅमिन A आणि C ने भरलेले असल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. लसूण आणि आल्यामध्ये असणारे ‘अँटी-इन्फ्लेमेटरी’ घटक पचनक्रिया सुधारतात आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण देतात. टोमॅटोमधील लाइकोपीन हिवाळ्यात चेहऱ्यावर तेज आणतो.
हिवाळ्यात शरीराची पचन प्रक्रिया सामान्यपेक्षा मंद होते, त्यामुळे हलके, गरम आणि पौष्टिक पदार्थ अधिक फायदेशीर ठरतात. सूप हा असा पदार्थ आहे, जो जड न वाटता पोट भरतो आणि शरीराला आवश्यक ओलावा व उष्णता देतो. विशेषतः थंड हवामानात गरमागरम देसी सूप घेतल्यास शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, थंडीची संवेदना कमी होते आणि पचनसंस्थेला आराम मिळतो.
घरच्या घरी बनवताना तेल, मसाले आणि मीठ यांचे प्रमाण कमी ठेवले तर हे सूप अधिक हेल्दी बनते. काही लोक या सूपमध्ये थोडेसे तूप किंवा मिरी पूड घालतात, ज्यामुळे त्याची उष्णता वाढते. सूपमध्ये थोडे फणस बी, मक्याचे दाणे किंवा हरभऱ्याची डाळ घालून त्याची प्रथिनेही वाढवता येते. त्यामुळे हे सूप लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरतो.
रोज एकदा हा देसी सूप घेतल्यास पचन सुधारते, त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो आणि शरीरात नैसर्गिक उर्जा टिकून राहते. हिवाळ्यात वारंवार भूक लागण्याची समस्या असते; अशा वेळी पोट न भरवता पौष्टिकता देणारा हलका सूप हे उत्तम पर्याय आहे. थंडी वाढत असताना किचनमधील काही सोप्या साहित्याने बनणारे हे सूप केवळ रुचकरच नाही, तर संपूर्ण शरीरासाठी एक नैसर्गिक "वॉर्मिंग टॉनिक" प्रमाणे काम करते.