what are the benefits of amla powder mix in luke warm water
पुढारी ऑनलाईन :
निसर्गात अशी फळे, भाज्या आणि गोष्टी आहेत त्याचा आपण दैनदिन आहारात समावेश केल्यास त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरासाठी होउ शकतात. असेच एक फळ म्हणजे आवळा. आवळ्याला आयुर्वेदात बहुगुणी म्हटले गेले आहे. आवळा हा शरीरासाठी एक वरदान आहे. एक ग्लास पाण्यात एक चमचा आवळा चूर्ण टाकून ते पाणी पिल्यास शरीराला जबरदस्त फायदे मिळतात. शरीरातील या अवयवांना तर नवसंजीवनी प्राप्त होते.
आयुर्वेदात अनेक आजारांवर आवळ्याला एक गुणकारी औषध मानले जाते. आवळ्यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते. त्यामुळे आवळा खाल्ल्याने किंवा आहारात समावेश केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आवळ्याला केस,त्वचा आणि डोळ्यासाटी फायदेशीर मानले गेले आहे. आपण रोज एक आवळा खाल्ला तरी शरीरातील विटॅमिन सी ची पूर्तता होउ शकते. जर आवळा मिळत नसेल तर एक ग्लास कोमट पाण्यात 1 चमच्या आवळा पावडर मिसळून पिण्यास सुरूवात करा. यामुळे शरीराला मोठे फायदे मिळतील.
मेटाबॉलिजममध्ये होईल सुधार...
रोज आवळ्याचे सेवन केल्याने मेटाबॉलिजम सुधारेल. आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळून पिल्याने मेटाबॉलिजम बुस्ट होईल. यामुळे पोटाच्या समस्या सुटतील. आवळा पावडरमुळे पोट फुगणे, पोट साफ न होणे तसेच ॲसिडिटीची समस्येतून मुक्ती मिळू शकेल.
इम्यून सिस्टिम बनेल मजबूत
आवळ्यामध्ये विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असते. जे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत होण्यासही मदत होते.
त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते
त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवळ्याचे नियमित सेवन फायदेशीर ठरते. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲटीऑक्सीडंट असतात. जे आपल्या केसांना मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील फुटकूळ्या, डाग कमी होण्यास उपयुक्त ठरते. चेहऱ्यावरील सुरकुत्यांवरही नियमित आवळ्याचे सेवन उपयुक्त ठरते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
आवळा चूर्ण (पावडर) फायबरचा मोठा स्त्रोत आहे. यात अँटी इंफ्लेमेंटरी गुणही असतात जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतात. पाण्यात आवळा पावडर खाल्ल्याने शरीरातील चर्बी कमी करण्यास फायदेशीर ठरते.
तणाव आणि शरीरातील साखरेवर रामबाण उपाय
आवळ्यात ॲटी स्ट्रेस गुण असतात जे तणाव कमी करतात. मानसिक आरोग्यासाठी आवळा चांगला आहे. आवळ्यामध्ये अँटी डायबेटिक गुणही आढळतात. जे शरीरातीज साखर नियंत्रित ठेवण्याची महत्वाची भूमिका बजावतात.
ही सर्व माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. वाचकांपर्यंत माहिती पोहोचविणे इतकाच याचा उद्देश आहे, तरी तज्ञांचा सल्ला घेवूनच आचरण करणे उचित ठरेल..