Weight Loss Tips : एका महिन्यात वजन कमी करायचं; मग ही ‘सात’ काम कराच Weight Loss Tips
आरोग्य

Weight Loss Tips : एका महिन्यात वजन कमी करायचं; मग ही ‘सात’ काम कराच

एका महिन्यात वजन कमी करायचं; मग ही ‘सात’ काम कराच

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिनाभर राहिला आहे कार्यक्रमाला, एखाद्या लग्नाला. वजन तर जास्त आहे आणि कार्यक्रमात स्लिम ट्रिमही दिसायचं आहे. आता काय करायचं ? असा प्रश्‍न तुम्‍हाला अनेकवेळा पडला असेल.यावर तुम्‍ही चर्चाही केली असेल. पण वजन कमी करण्‍यासाठी सुरुवात कशी करायची याला वेळच मिळत नाही. काही कारणांस्‍तव राहूनच जाते. कंटाळा केला जातो; पण काही छोट्या छोट्या गोष्टी दररोज केल्या तर तुमचं वजन कमी (Weight Loss Tips) नक्की होईलच. जाणून घेवूया वजन कमी करण्‍यासाठी आपल्‍या जीवनशैलीत नेमके कोणते बदल करावे याविषयी…

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी या गोष्टी करा

बदलत्या जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. त्यातील एक परिणाम म्हणजे वजनवाढ. बऱ्याचजणांना वजन वाढीचा त्रास होताना दिसत आहे. वजनामुळे इतर आजारही जडत आहेत. पण वजन कमी करायचं असेल तर स्वत:साठी वेळ देवून या सात गोष्टी करा. तुम्ही नक्की सदृढ व्हालं आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदतही होईल.

चालायला सुरुवात करा

तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर पहिल्यांदा चालायला सुरुवात करा. चालण्यामुळे तुमचं शरीर सदृढ होण्यास मदत होते. किमान ३० ते ४० मिनीटे तेजीने चाला. जेणेकरुन तुम्हाला घाम येईल. पण तुम्हाच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही सकाळी २० मिनिटे आणि सायंकाळी २० मिनिटे चाललं तरीही चालेल. जर चालायला सुरुवात केली तर त्यामध्ये सातत्य ठेवा. एक दिवस चालला आणि चार दिवस नाही अस नाही चालणार. चालण्‍याच्‍या व्‍यायामात नियमितपणा खूपच महत्त्‍वाचा ठरतो.

खाण्यावर नियंत्रण ठेवा

जेवढं तुम्हाच्या पोटाला हवं आहे तेवढचं खा. आवडता पदार्थ आहे म्हणून खातचं राहू नका. जेणेकरून तुमच्या शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत होईल. कॅलरीज नियंत्रणात राहतील. खाण्यात फायबर जास्त ठेवा. फायबर युक्त खाण्याने भूक कमी लागते कारण बराचवेळ पोट फायबरमुळे भरल्यासारखे राहते. हिरवे वाटाणे, सोयाबीनच्या शेंगा, बीन्स, नाशपती, डाळी, ओटमील आदी पदार्थात फायबर आढळते. त्याचबरोबर अतिरिक्त खाण्यासही टाळावे.

हेल्दी स्नॅक्स

काहीवेळा फक्त काहीतरी खात रहावं वाटत. पण तुम्हाला वजनही कमी करायचं असतं. तर हेल्दी स्नॅक्स खायला सुरुवात करा. यासाठी सकाळी नाष्ट्यानंतर आणि दुपारी जेवणानंतर हेल्दी स्नॅक्स खा. यात फायबर आणि प्रोटीनयुक्त सत्व असतात. जी तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतात.

Weight Loss Tips : भरपूर पाणी प्या

वजन कमी करण्यासाठी पाणीही खुप परिणामकारक ठरत असतं. बरेचजण सांगतात भरपुर पाणी प्या. पण कीती भरपूर पाणी प्यायचं हेही महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरात शरीरात पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. पाणी शरीरात कमी असणं आणि जास्त असणं दोन्हीही शरीरास हानिकारक असतं. तुमच्या शरिराला जेवढं गरजेचं आहे. तेवढं पाणी प्या. पाणी पिल्याने शरीर हाइड्रेटेड राहण्यास मदत होते. आणि वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे हेही वजन कमी करण्यास मदत करतं. त्याचबरोबर लिंबुपाणी आणि नारळाचं पाणीही तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे पचनशक्ती चांगले राहते. शरीरातील अनावश्यक द्रव्ये (Toxin) बाहेर पडण्यास मदत होते.

साखर कमी खा

बऱ्याच लोकांना गोड खाण्यास खुप आवडतं. एकादा कार्यक्रम असेल तिथे गोड-धोड असतं तुम्हालाही ते खाण्याचा मोह आवरतं नाही व कोणीतरी येत आणि खाण्याचा आग्रहही करत राहतं तुम्ही मन राखण्यासाठी खात राहता. पण आहारातून जास्त प्रमाणात गोड खाणं शरीरास हानिकारक ठरतं. प्रयत्न करा की, केक, पेस्ट्री, आईस्क्रिम, बिस्किट यासारखे पदार्थ टाळा.

डबाबंद पदार्थ टाळा

वजन कमी करायचं असेल तर डबाबंद पदार्थ टाळा. हे पदार्थ प्रक्रिया केलेले असतात. हे पदार्थ वजन कमी करण्यासाठी मारक ठरतात. डबाबंद पदार्थाने वजन वाढण्यास मदत होते. शक्यतो हे पदार्थ टाळाचं.

Weight Loss Tips : व्यायाम करा

तुम्ही वजन कमी करण्यासाठी चालत असता. पण अर्धा तास (Exercise) पण करा. यात तुम्ही झुंबा डान्सही करु शकता. योगा आवडत असेल तर योगाही करु शकता. डान्स करायचा असेल तर तेही चालेल. पण या व्यायामात सातत्य ठेवा. जेणेकरुन वजन कमी होतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT