थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका (Pudhari File Photo)
आरोग्य

Urinary Problems In Winter | थंडीत वाढतोय मूत्रविकाराचा धोका

थंडीमुळे केवळ श्वसन किंवा सांध्याच्या समस्याच नव्हे, तर मूत्रविकाराचा संसर्ग, मूतखडा आणि मूत्रविकाराच्या इतर समस्या डोकं वर काढू शकतात.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अनिल ब्राडू

जसे तापमान कमी होते आणि हिवाळा सुरू होतो, तसतसे मोठ्या संख्येने लोकांना मूत्रविकाराच्या समस्या उद्भवतात. हिवाळ्यात निर्जलीकरण, पाणी कमी पिणे, मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय), मूतखडा आणि मूत्राशयाच्या अस्वस्थतेचा धोका वाढतो.

मूत्रमार्गाचा संसर्ग :

हा सामान्यतः हिवाळ्याच्या दिवसात होतो. कारण, या दिवसांत लोक कमी पाणी पितात, ज्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते आणि मूत्राशयात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढू शकते. त्याचप्रमाणे थंड हवामानात घट्ट कपडे घातल्यानेदेखील ओलावा टिकून राहू शकतो आणि बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. याकरिता डिहायड्रेशन टाळणे आणि निरोगी जीवनशैली बाळगणे योग्य ठरते. मूतखडा : थंड हवामानामुळे शरीराला घाम कमी येतो आणि लघवी जास्त प्रमाणात होते, ज्यामुळे नकळत डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे लघवीमुळे मूतखड्याचा धोका वाढतो. मूत्रपिंडातील खड्यांमुळे जेव्हा वेदना होतात त्या असह्य असतात, म्हणूनच वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते.

अतिक्रियाशील मूत्राशय :

बरेचजण या समस्येचा सामना करतात. थंड हवामानामुळे मूत्राशयाचे स्नायू अधिक संवेदनशील होतात. बर्‍याचजणांना वारंवार लघवी करणे हे लाजिरवाणे वाटते. बरेचजण हिवाळ्यात जास्त प्रमाणात शौचालयात जाण्याची गरज भासल्याचे सांगतात, जरी द्रव पदार्थाचे सेवन जास्त प्रमाणात करत नसले, तरीही वारंवार लघवीला होते. अशा समस्या जाणवल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुरुषांमध्ये प्रोस्टेट समस्या: प्रोस्टेट वाढलेल्या पुरुषांना हिवाळ्यात वारंवार लघवी होणे, लघवी करताना त्रास होणे किंवा मूत्राशय रिकामे न झाल्यासारखे वाटणे यासारखी लक्षणे वाढू शकतात.

प्रत्येकाला हायड्रेटेड रहावे आणि तहान लागली नसली तरीही किमान 3 लिटर पाणी प्यावे. या शिवाय, हर्बल टी, सूप आणि अगदी कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. या टिप्सचे पालन केल्याने तुम्हाला शरीर हायड्रेटेड राहण्यास आणि संबंधित आरोग्य समस्या दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

आहारावर लक्ष केंद्रित करावे आणि क्रॅनबेरी, लिंबूवर्गीय फळं आणि डाळिंब यांसारखी फळं निवडावीत, जी मूत्रमार्गाच्या आरोग्यास मदत करतात. मूत्रपिंडांवर ताण येतील असे खारट पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळावे.

कॅफिन आणि अल्कोहोलयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. कारण यामुळे मूत्राशयात जळजळ होऊ शकते आणि निर्जलीकरणाची शक्यता देखील वाढू शकते. योग्य स्वच्छता बाळगणे, चांगली स्वच्छता राखणे गरजेचे आहे. कोणतेही रासायनिक पदार्थ वापरू नका आणि श्वास घेण्यायोग्य अंतर्वस्त्रांचा वापर करा.

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि मूत्राशयाच्या चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करावा. जर जळजळ, वेदना, लघवीवाटे रक्त येणे किंवा रात्री वारंवार लघवीला जावे लागत असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT