डॉ. मनोज कुंभार
मधुमेह शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करतो. थकवा, चिडचिड, कार्यक्षमता कमी होणे, मानसिक आरोग्याचे प्रश्न, आयुष्यभर औषधे आणि इन्सुलिन यांवर अवलंबित्व. शिवाय हृदयरोग, किडनी विकारांसारख्या इतर गंभीर समस्यांचे दारही तो उघडतो.
मधुमेह हा आजच्या काळातील सर्वात गुंतागुंतीचा आणि भीतीदायक रोग मानला जातो. एखाद्या व्यक्तीला 30- 35 वर्षांच्या वयात टाईप दोन प्रकारातील मधुमेह झाला की, सुरुवातीला त्या व्यक्तीचे लक्ष फक्त उपचार, औषधे आणि नियंत्रण यावर केंद्रित होते. पण जसजसे वास्तव समोर येऊ लागते, तसतसे बहुतांश पालकांच्या मनात एकच प्रश्न उभा राहतो की, ही समस्या माझ्या मुलांकडे जाणार नाही ना? आणि बहुतेकवेळा तज्ज्ञांकडून मिळणारे उत्तर एकच असते की, मुलांना गोड कमी द्या. पण हे उत्तर जितके सोपे वाटते तितके ते वास्तवाशी जुळणारे नाही. कारण साखरेचा वापर कमी करणे, कार्बोहायड्रेट कमी करणे यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी चांगल्याच असल्या, तरी या केवळ सुरुवातीच्या पातळीवरील उपाययोजना आहेत. मधुमेहाच्या मुळाशी असते ती आनुवंशिक प्रवृत्ती. म्हणजेच शरीरात आधीपासूनच असणारी जोखीम. जीवनशैली हा केवळ ट्रिगर असतो, पण ट्रिगरला ओढ देणारी प्रत्यक्ष बंदूक म्हणजे जनुकीय दोष.
पूर्वीच्या संशोधनात फारच कमी जीन या रोगासाठी जबाबदार आढळत होते. त्यामुळे मधुमेहाला लाईफस्टाईल डिसीज असा एकतर्फी शिक्का बसला. पण नवीन जीनोम-वाईड असोसिएशन स्टडीजने चित्र पूर्ण बदलले. आता 150 हून अधिक जीन व्हेरिएंट टाईप-2 मधुमेहाशी थेट जोडले गेले आहेत आणि या रोगाची आनुवंशिक वारसा शक्यता 70 ते 90 टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच अनेकदा एखाद्या पिढीत रोग न दिसताही जोखीम पिढ्यान्पिढ्या शांतपणे पुढे जात राहते. खूप जणांना आश्चर्य वाटते की, कुटुंबात कुणालाही मधुमेह नसताना स्वतःला कसा झाला? पण आजोबा-आज्या, मामा-मावश्या किंवा चुलते-आत्या यांच्याकडेही जोखीम असू शकते. त्यांनी रोग कधी अनुभवला नाही म्हणून तो तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, असे होत नाही. म्हणूनच दिसत नसले, तरी आनुवंशिक वारसा शांतपणे पुढे चालू असतो.
याचा शोध लावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मुलांसाठी उपलब्ध असलेले सहज, वेदनारहित आणि प्रभावी जनुकीय परीक्षण करणारे ‘एप्लिमो’सारखे बायोहॅकिंग टूल. केवळ लाळेच्या नमुन्यावर आधारित हे परीक्षण मुलांना त्रास न देता त्यांची मधुमेह प्रवृत्ती किती गंभीर आहे, हे स्पष्ट दाखवते. बाजारात अनेक जनुकीय चाचण्या असल्या, तरी एप्लिमोचे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त निदान करत नाही, तर वैयक्तिकृत जीवनशैली उपाय म्हणजेच बायोहॅक्ससुद्धा सुचवते. हे बायोहॅक्स केवळ आहार नियंत्रणापुरते मर्यादित नसतात. ते त्यापलीकडे जातात आणि मुलांना सहज रुचतील अशा खेळ, सायकलिंग, मजेदार क्रिया, योग्य झोप, नैसर्गिक पूरक आहार, ध्यान, प्राणायाम, योग, जिम अशा सर्वसमावेशक मार्गांचा समावेश करतात.
मुलांना हे आचार पाळण्यासाठी सक्ती करावी लागत नाही, ते त्यांना आवडतात, त्यामुळे अंमलबजावणीही सहज होते. या उपायांचा सर्वात मोठा फायदा भविष्यात मिळतो. कारण मधुमेह शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करतो. थकवा, चिडचिड, कार्यक्षमता कमी होणे, मानसिक आरोग्याचे प्रश्न, आयुष्यभर औषधे आणि इन्सुलिन यांवर अवलंबित्व. शिवाय हृदयरोग, किडनी विकारांसारख्या इतर गंभीर समस्यांचे दारही तो उघडतो. एप्लिमो हे एकाचवेळी शेकडो जीवनशैली रोगांची जोखीम तपासून अशा समस्यांना प्रारंभीच रोखण्यास मदत करते.