Typhoid Fever : धोका टायफॉईडचा Pudhari File Photo
आरोग्य

Typhoid Fever : धोका टायफॉईडचा

भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशांमध्ये या संसर्गाचा धोका अधिक

पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनोज कुंभार

टायफॉईड हा सॅल्मोनिआ टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्ग आहे. आपल्याकडे आता पावसाळा सुरू झालाय. हा रोग विशेषतः दूषित पाणी आणि अन्नाच्या माध्यमातून पसरतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशांमध्ये या संसर्गाचा धोका अधिक असतो.

टायफॉईडची लक्षणं

सलग अनेक दिवस ताप येणे.

अशक्तपणा, भूक मंदावणे

पोटात दुखणं, मळमळ, उलटी

पोट साफ न होणे किंवा अतिसार

डोकेदुखी, कधी कधी पुरळ उठणे.

बचावात्मक उपाय

फक्त उकळून थंड केलेलं, फिल्टर केलेलेच पाणी प्या.

रस्त्यावर मिळणारी थंड पेये, बर्फाचे गोळे, सरबते, ज्यूस पिणे टाळा.

पाणीपुरी, फळांचे चाट, अर्धवट किंवा कच्च्या अन्नपदार्थांमधून टायफॉईड पसरण्याचा धोका अधिक असतो. सबब शक्यतो घरचे ताजं अन्न खा.

फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून मगच वापरा. हिरव्या भाज्या काही वेळेकरिता मिठाच्या पाण्यात भिजवाव्यात.

जेवणाआधी आणि नंतर हात साबणाने धुवायला एकदाही विसरू नका.

घरातील स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृह स्वच्छ ठेवा.

टायफॉईडपासून संरक्षणासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. लहान मुलांना आणि वारंवार आजारी पडणार्‍यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने लस द्यावी.

घरात उरलेलं अन्न लगेच थंड ठिकाणी ठेवा. ताजं अन्न खाण्यावर भर द्या.

पाणी, ताक, लिंबूपाणी, नारळपाणी यांचा भरपूर सेवन करा.

कृत्रिम रंगयुक्त व साखरयुक्त पेये टाळा.

योग्यवेळी उपचार न केल्यास

टायफॉईडची लक्षणे दिसू लागताच वेळीच न उपचार केल्यास त्यांचे गंभीर दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात.

इंटेन्स्टाईन पेरफोरेशन म्हणजेच आतड्याला छिद्र पडणे

दीर्घकाळ ताप येत राहणे

यकृत आणि प्लिहावर परिणाम; क्वचित प्रसंगी जीवाला धोका

हे टाळण्यासाठी वरील लक्षणे दिसू लागल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत. तसेच योग्य पाणी, स्वच्छ अन्न, स्वच्छता आणि सजगता यामुळे आपण आणि आपले कुटुंब या आजारापासून सुरक्षित राहू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT