आरोग्य

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी…

Pudhari News

आपल्या आहाराच्या सवयी, जीवनशैली आणि आसपासची परिस्थिती याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात. हे विषारी घटक बाहेर काढणे खूप गरजचे असते. शरीर स्वतःच असे विषारी घटक बाहेर टाकत असते. यकृत आणि मूत्रपिंडाच्या मदतीने शरीर विषारी घटक शरीराबाहेर टाकते; पण काही वेळा डिटॉक्सिफाय करावे लागते. 

काकडी : काकडीमध्ये असलेले 95 टक्के पाणी लघवीवाटे बाहेर टाकले जाते. त्यामधून विषारी रसायने, आम्लीय पदार्थ बाहेर पडतात. काकडी सॅलडचे सेवन केल्यास सर्वाधिक फायदा होतो. शरीरासाठी असणार्‍या पाण्याची गरज काकडी खाऊनही पूर्ण करता येते. पाणी शरीरातील अर्ध्या नुकसानकारक गोष्टी बाहेर टाकण्याचे काम करते. 

कोथिंबीर : कोथिंबिरीची पाने कच्ची खाऊन, पदार्थात घालून किंवा धणे खाऊनही शरीरातील हानीकारक रसायने सहजपणे दूर करता येतात. 

कांदा पात : अँटी ऑक्सिडंट आणि सल्फरने युक्त कांदापातीमुळे शरीरातील विषारी द्रव्ये नष्ट होण्यास मदत करणारी एन्झाईम्स सक्रिय होतात. तसेच, कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कांदा पातीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हार्ट अ‍ॅटॅक आणि लकव्याचा धोका कमी होतो. ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारापासूनही बचाव करण्यास कांदापातीचे सेवन उपयुक्त आहे. 

अक्रोड : अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असतात. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त असतेच, पण डिटॉक्सिफिकेशनचे कामही चांगल्या प्रकारे होते. त्यातील तांबे, मॅग्नेशिअम आणि बॉयटिन कर्करोगासारखा विकार दूर ठेवतात. आहारातील प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता कमी होते. अँटिऑक्सिडंट आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. फ्री रॅडिकल्स दूर करून अवेळी येणारे वृद्धत्वाची समस्या दूर करते. 

सूर्यफुलाच्या बिया : सेलेनियम रसायन आणि ई जीवनसत्त्वयुक्त या बिया यकृताची कार्यक्षमता वाढतात. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखतात. त्यात असलेले मॅग्नेशिअम हृदयाची ताकद वाढवते. रक्तदाब वाढवणारी रसायने डोपामाईन डी-1 कमी करते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT