थायरॉईड समस्या आणि दिनचर्या  Pudhari File Photo
आरोग्य

थायरॉईड समस्या आणि दिनचर्या

थायरॉईड समस्या सामान्यत: हार्मोनल असंतुलनामुळे होते

पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनोज कुंभार

थायरॉईड समस्या सामान्यत: हार्मोनल असंतुलनामुळे होते. अ‍ॅन्डोक्राईन ग्लँडच्या विकारामुळे हायपरथायरॉईड किंवा हायपोथायरॉईड समस्या निर्माण होते. यावर उपचारार्थ दिली जाणारी औषधे सकाळी उपाशीपोटी घ्यायची असतात. परंतु, याचे पालन न करता मनमानीपणाने रुटिन ठेवले आणि त्यानुसार औषधे घेतल्यास थायरॉईडचा उपचार योग्य पद्धतीने होत नाही.

थायरॉईडची औषधं उपाशीपोटी घ्यावीत. परंतु, अनेक जणऔषध घेतल्यावर लगेचच चहा किंवा कॉफी पितात. हे कॅफीन औषधाच्या प्रभावावर परिणाम करू शकते. औषध घेतल्यावर कमीत कमी एक तास चहा किंवा कॉफी पिण्यापासून टाळा.

थायरॉईडच्या औषधासोबत इतर कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट्स घेणं योग्य नाही. तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यायचे असतील तर थायरॉईडच्या औषधांनंतर कमीत कमी 4 तासांनी ते घ्या.

बरेच लोक फळं किंवा प्रोटिन खाऊन दिवसाची सुरुवात करतात; परंतु थायरॉईडसाठी तूप किंवा काजू आणि बदाम यांसोबत सुरुवात करणे फायदेशीर ठरते. यासोबत एक किंवा दोन ब्राझील नट्स खाल्ले तरी चांगले आहे, कारण हे थायरॉईडसाठी उपयुक्त असतात.

सकाळी कमीत कमी 15 मिनिटं सूर्यप्रकाशात उभं राहा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळू शकतो. व्हिटॅमिन डी ची कमतरता थायरॉईड फंक्शनला प्रभावीत करू शकते, म्हणून हे आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवणे अत्यंत आवश्यक आहे.

मेटाबॉलिझमचा वेग किंवा मंद असल्यास तो वाढवण्यासाठी व्यायाम करा. यासोबतच, डिनर आणि सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किमान 11 तासांचा अंतर ठेवा. यामुळे मेटाबॉलिझमला बूस्ट होण्याची संधी मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT