कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापुरातील सीपीआरच्या कोरोना कक्षात आज, शनिवारी तिघा संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. या तिघा रुग्णांच्या स्वॅब अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तिघांच्या मृत्यूमुळे कोल्हापूर जिल्हा आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वाचा : …तर लॉकडाऊन कालावधी ३० एप्रिलनंतरही वाढू शकतो'
सीपीआरच्या कोरोना कक्षात चिकुर्डे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील ५९ वर्षीय महिलेचा आज सायंकाळी साडेचार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. नेसरी (गडहिंग्लज) येथील ५० वर्षीय व्यक्तीचा सकाळी ८ वाजता मृत्यू झाला. तसेच मसूद माले (ता. पन्हाळा) येथील आठ महिन्याच्या बाळाचा देखील मृत्यू झाला असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाने दिली आहे.
वाचा : लॉकडाऊन किमान ३० एप्रिल पर्यंत कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
दरम्यान, कोल्हापुरात आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण झाले आहेत. भक्तीपूजानगर येथील पहिल्या पॅाझिटिव्ह तरुण रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हा तरूण कोरोनामुक्त झाला असला तरी त्याला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे, अशी माहिती सीपीआरच्या अधिष्ठाता डॅा. मिनाक्षी गजभिये यांनी दिली.