आरोग्य

सातारा : मलकापुरात एकाच दिवशी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; कराड तालुक्‍यात ६१ रुग्ण

Pudhari News

कराड : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी सकाळी मलकापूर येथील १५ वर्षाच्या मुलासह महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा मलकापूरमधील आणखी एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच दिवशी मलकापूरमध्ये तीन नव्या रुग्णांची भर पडली असून कराड तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ६१ झाली आहे. 

अधिक वाचा : सातारा : कराडमधील दोघे झाले कोरोनामुक्त (video)

कराड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी दिवसभरात कराड तालुक्यात तिघा नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली. त्यामुळे मलकापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. सोमवारी सकाळी तालुक्यातील सुमारे १५७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यात सायंकाळी आणखी १८ जणांची भर पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचवेळी जिल्ह्यातील २९३ जणांना सोमवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील १६५ जणांचा समावेश आहे.

अधिक वाचा : सातारा : पाटणसह पाच गावांना मिळाली सूट 

दरम्यान, कराड तालुक्यात सोमवारी दोघा कोरोनाग्रस्त रुग्णांना मलकापूर (कराड) येथील कृष्णा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यापूर्वी याच रुग्णालयातून कराड तालुक्‍यातील तीन तर पाटण तालुक्यातील एका दहा महिन्याच्या चिमुकल्यास डिस्चार्ज मिळाला होता. तर तालुक्यातील एका रुग्णांचा उपचारावेळी दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत कराड तालुक्यात सुमारे ५५ रुग्णांवर कराडमधील कृष्णा रुग्णालय तसेच सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : कराडमधील आणखी दोघांना कोरोना 

SCROLL FOR NEXT