आरोग्य

Benefits of walking : चालण्याचे ‘असे’ आहेत लाभ…

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्‍ली :  आपल्याकडे प्राचीन ग्रंथांमध्ये 'चरैवेती चरैवेती' म्हणजेच 'चालत राहा, चालत राहा' असा उपदेश केलेला आहे. व्यायामाच्या द‍ृष्टिकोनातूनही हा उपदेश महत्त्वाचा ठरतो. चालणे हा दमछाक न करणारा; पण आरोग्याला लाभ देणारा सहजसोपा व्यायाम आहे. चालण्यामुळेही कॅलरीज बर्न होतात आणि वजन घटवण्यासाठी मदत मिळते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

चालणे ही एक शारीरिक क्रिया आहे आणि तिचे अनेक लाभ आहेत. चालण्यामुळे स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत होतात. तसेच चयापचय क्रिया वाढवण्यासाठी मदत मिळते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमितपणे अर्धा तास चालणे आवश्यक आहे. चालण्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. रक्‍तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका यामुळे कमी होतो. आठवड्यातून पाच दिवस किमान तीस मिनिटे चालणे यासाठी आवश्यक आहे.

केवळ हेवी वर्कआऊटस् आणि व्यायाम करून कॅलरीज जाळता येतात असे नाही. चालण्याच्या व्यायामामुळेही हे शक्य होते व वजन घटते. मात्र, ते किती वजन कमी करायचे आहे आणि तुम्ही किती वेगाने तसेच किती दिवस चालत आहात यावर अवलंबून आहे. चालण्यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते. त्यामुळे नॉरेपाइनफ्रीन आणि एपिनेफ्रीन यासारख्या हार्मोन्सची पातळीही वाढते.

नक्षलवाद्यांशी सामना करणाऱ्या गडचिरोलीच्या धाडशी पोलिसांशी संवाद | Ground Report of Gadchiroli

SCROLL FOR NEXT