आरोग्य

summer season : उन्हाळा आणि आरोग्य ; घराबाहेर पडताना घ्‍या ‘ही’ काळजी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा (summer season) सुरू झाला की, " अरे…ऐकलंस का? बाहेर लय उन हाय.. डोक्याला कायतर घालून जा…", " अहो…बाहेर जाताय टोपी घाला, पाण्याची बाटली सोबत ठेवा." असे शब्द आपल्या कानावर पडू लागतात. बाहेर पडल्‍यानंतर आपल्याला उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होते. दैनंदिन कामाव्यतिरिक्त इतर कामासाठीही आपल्याला अचानक घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे भरदुपारी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही कडक उन्हात (summer season)  घराबाहेर पडत असाल, तर काेणती काळजी घ्यावी हे जाणून  घ्‍या…

summer season : अशी घ्या काळजी

  • उन्हाळ्यामध्ये (summer season) दुपारी घराबाहेर अत्यंत महत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडा.
  • दैंनंदिन कामे सकाळ आणि सायंकाळी करावीत.
  • कष्टाची कामे  उन्‍हाचा तडाखा वाढण्‍यापूर्वीच करावी
  • कडक उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत काही वेळ आराम करावा.
  • घराबाहेर पडताना, काळ्या रंगाचा गॉगल, शुभ्र रंगाची कपडे, टोपी आणि छत्री वापरा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने नैसर्गिक सनस्क्रीनचा वापर करावा.
  • बाहेरचे पाणी पिणे टाळा, नेहमी स्वच्छ, थंड पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • रूमाल ओला करून, थोड्या- थोड्या वेळाने चेहरा, मान पुसावे.
  • बाहेरून आल्यावर थंड पाण्याने आंघोळ करावी.
  • अति उन्हाच्या कडाक्यात गरोदर महिला आणि बाळंतीणींनी बाहेर पडू नये.
  • लहान मुलांना घराबाहेर घेऊन जाणे टाळावे.
  • महत्त्वाचे काम असल्यास, लहान मुलांना घराबाहेर घेऊन जाताना शुभ्र कपडे घालावी, डोक्याला टोपी, सोबत पाणी ठेवावे.

पाहा व्हिडिओ : All About Cricket – बॅटिंगच्या बेसिक टिप्स | from Imran Patel

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT