गोड खाण्याची सवय भारतीयांच्या जीवनात जुनी आहे. साधारणतः लोक साखरेपेक्षा गूळ जास्त चांगला मानतात. गूळ हा नैसर्गिक मानला जातो, त्यात थोडे खनिजद्रव्य, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम असतात. पण तरीही तो साखरेचाच प्रकार असल्याने त्यात कॅलरी जास्त असतात.
साखर मात्र पूर्णपणे रिफाइंड (Refined) असल्याने त्यात पोषकद्रव्य नसतात, फक्त रिकाम्या कॅलरी मिळतात. त्यामुळे स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकार यांचा धोका वाढतो. गूळ थोडा कमी हानिकारक असला तरी मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास त्याचाही परिणाम साखरे सारखाच होतो. म्हणूनच गोड पदार्थात ‘साखर असो वा गूळ’, दोन्ही मर्यादेत खाणं महत्त्वाचं आहे.
दैनंदिन जीवनात गोड खाताना बहुतेकजण आपल्या बदललेल्या जीवनशैलीचे स्पष्टीकरण देताना सांगतात की, , “मी साखर टाळतो… पण गूळ खातो!” पण हे गुळ खाणं आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे का? गूळ "थोडा चांगला" असला तरी तोही साखरच आहे. डायबेटिक, प्री-डायबेटिक, वजन कमी करणारे, PCOS किंवा Fatty Liver असलेल्यांनी दोन्हींपासून दूर राहावं. गोड खाल्लं म्हणजे गुन्हा नाही, पण रोजची सवयच आजार वाढवते. याविषयी तज्ज्ञ काय सांगतात ते समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
गूळ नैसर्गिक, पण सुरक्षित नाही
गूळाला Natural Sugar म्हणतात, पण तो Low Glycemic नसतो. रक्तातील साखर झपाट्याने वाढवण्याची ताकद गुळातही आहे. त्यामुळे गुळ नैसर्गिक पद्धतीने जरी बनवला असला तरी तो मानवी शरीरासाठी सुरक्षित नाहीच.
साखर विरुद्ध गूळ
या दोन्हीमध्ये फारच कमी फरक आहे. साखर जवळपास ९९% Sucrose असते. गुळात ८५–९०% साखर असते आणि उरलेले थोडे Trace minerals. म्हणजे पौष्टिकतेत फारसा फरक नाही.
डायबेटिससाठी धोकादायक
डायबेटिक व्यक्तींनी गूळ खाल्ला तरी HbA1c (ब्लड शुगरचे दीर्घकालीन मोजमाप) वाढते. "हे नैसर्गिक आहे" या भ्रमामुळे लोक जास्त प्रमाणात गूळ खातात. परंतु डायबेटिस रुग्णांसाठी हा धोका ठरू शकतो.
Raw sugar, Brown sugar, Organic jaggery = फसवणूक?
नावं बदलली तरी परिणाम जवळपास तेच. रक्तातील साखर वाढवण्याची क्षमता तिन्हींत सारखीच आहे. त्यामुळे बाजारातील विविध ब्रॅडेड कंपन्यांची सारख आणि गुळ म्हणजे केवळ फसवणूक आहे.
कॅलरीज व Glycemic Load सारखेच
गूळ साखरेच्या तुलनेत “हेल्दी” पर्याय नाही. दोन्हींचं प्रमाण मर्यादित ठेवलं तरच ठीक. यामुळे शरीराचा संतोल बिघडू दिला जात नाही.
साखर का गूळ, कोण चांगलं?
दोन्ही अधूनमधून, मध्येच मर्यादित वापर ठीक आहे. पण नियमित सेवन करणे हे हृदय, लिव्हर, वजन यासाठी नुकसानकारक आहे तसेच शरीरासाठी देखील हे हानिकारक ठरू शकते.
गुळात मोठ्या प्रमाणात Iron
गुळात आयर्न असतं असा मोठा समज आह, पण ते प्रमाण अपुरं आणि अनियमित आहे. खरं आयर्न पालक, बीट, डाळी, कडधान्यांतूनच मिळतं.
थंडी-खोकल्यासाठी गूळ
Cold, cough साठी गूळ वापरायला हरकत नाही पण तेही मर्यादित व वेळेपुरतं. रोजच्या चहात गूळ वापरणं हृदयासाठीही वाईटच आहे.
गोडाची सवयच घातक
लहान मुलं असो वा मोठे, गोडाची सवय (साखर/गूळ दोन्ही) भविष्यात डायबेटिस, स्थूलता, हार्मोनल प्रॉब्लेम वाढवते. त्यामुळे कोणत्याही वयात गोड खाण्याची सवय असणे हे निरोगी आरोग्यासाठी घातकच आहे.
ताजं फळ खा
दालचिनी, वेलचीसारखे मसाले वापरा
पदार्थ चवीनं खा, पण रोज साखर/गूळ टाळा