७२% भारतीय आनंदी असतात तेव्‍हा स्नॅक्स खातात! जाणून घ्‍या नव्‍या सर्वेक्षणातील माहिती 
आरोग्य

७२% भारतीय आनंदी असतात तेव्‍हा स्नॅक्स खातात! जाणून घ्‍या नव्‍या सर्वेक्षणातील माहिती

७२% भारतीय आनंदी असतात तेव्‍हा स्नॅक्स खातात! जाणून घ्‍या नव्‍या सर्वेक्षणातील माहिती

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही कधी स्वत:च निरीक्षण केलं आहे का? जेव्‍हा तुमचा मूड चांगला असेल तुम्‍ही आनंदात असता. यावेळी तुम्‍ही काही तरी खात असता, असे नव्‍या सर्वेक्षणाचा अहवाला नमूद करण्‍यात आले आहे. तुम्हाला वाटलं असेल की माणसाची मानसिक अवस्था, भावना आणि आहार यांचा संबंध असतो का? पण तज्ज्ञांच्या मते आहार आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. यापूर्वीही सिद्ध झाले आहे की, माणसाच्या भावनिक अवस्थांचा त्याच्या आहारावर परिणाम होतो. ( Snack when happy )

व्यक्तीचे मानसिक आरोग्य आणि भावनिक अवस्था या प्रामुख्याने माणसाच्या खाण्याच्या सवयी निर्धारित करतात, हे यापूर्वी झालेल्‍या अनेक अभ्यासात सिद्ध झालं आहे. सुरक्षितता, तंत्रज्ञान, चव, सुलभता आणि मूड सुधारणे ( STTEM ) या पाच घटकांवर भर देणारे हे सवेंक्षण देशातील उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व विभागांमध्ये करण्यात आला. तसेच मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, लखनौ, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळूर सारख्या दहा शहरांचाही यामध्‍ये समावेश होता. (Snacking)

Snack when happy : आनंदी लोक स्नॅक्सला प्राधान्य देतात

गोदरेज यम्मीझचा इंडिया स्नॅकिंग सर्वेक्षण अहवालात नमूद करण्‍यात आले आहे की,. ('STTEM – Safety, Technology, Taste, Ease & Mood Uplifter') सुरक्षितता, तंत्रज्ञान, चव, सुलभता आणि मूड या पाच घटकांवर भर दिला जातो. या अहवालात स्नॅक्स् खाण्यामुळे मानवी मुडमध्ये सुधारणा कशी होते, यावर प्रकाश टाकला आहे. मनाची स्थिती आणि स्नॅक्स खाण्याची तयारी यांच्यातील संबध स्पष्ट केला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, भारतातील ७२% लोकांनी मान्य केले आहे की, ते आनंदात असताना स्नॅक्स खातात. तर ७०% भारतीय लोक स्नॅक्स घेतल्यानंतर समाधानी, आनंदी आणि उत्साही वाटते.

भारतातील प्रादेशिकदृष्ट्या विचार करता पूर्व भारतातील ७५ टक्के, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारताने अनुक्रमे ७२ , ६७ आणि ७४ टक्के नागरिक आनंदी असताना जास्त नाश्ता करतात. शहरांचा विचार केला असता दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथील लोक आनंदी असताना अधिकचा नाश्ता करतात. ही टक्‍केवारी दिल्ली ८१ चेन्नई आणि हैदराबाद प्रत्येकी ७७ तर कोलकाता येथे ७५ इतकी आहे. मुंबई येथे आनंदी असणारी सरासरी ६८ टक्के लोक स्नॅक्स खाण्‍यास प्राधान्‍य देतात. अहमदाबादमधील नागरिकांना आनंदी असताना स्नॅक्सची निवड केलेली सरासरी ६७ टक्के लोक आहेत. पुणे आणि बंगळूर शहरात प्रत्येकी ६६ टक्के तर लखनौ ६२ आणि जयपूर ६१ टक्के लोक आनंदी असताना खाण्‍यास प्राधान्‍य देतात. ७४ टक्के स्त्रिया आणि ७० टक्के पुरुष आनंदी असताना जास्त नाश्ता करतात, असेही या सर्वेक्षणास निदर्शनास आले आहे.

स्नॅक मूड सुधारण्यास मदत करते

देशातील विविध भागातील एकुण २८१५ लोकांनी गोदरेज यम्मीझचा इंडिया स्नॅकिंग सर्वेक्षण वेळी उत्तर दिले. त्यापैकी २५ टक्के उत्तर भारताचे, ३६ टक्के दक्षिण भारताचे, २५ टक्के देशाच्या पश्चिम भागाचे आणि उर्वरित १४ टक्के पूर्वेकडील भागाचे प्रतिनिधित्व करतात. यातील ४२ टक्के अविवाहित लोक आणि ५२ टक्के विवाहित लोकांचा समावेश आहे. सर्वेक्षणात असे आढळले आहे की, ५६ टक्के लोक दु:खी असताना अधिक स्नॅक खाण्यास प्राधान्‍य देतात आणि ४० टक्के भारतीयांचा असा विश्वास आहे की स्नॅक कंटाळवाण्या अवस्थेतून बाहेर पडण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करते.

Snack when happy : स्नॅक्स खाणारे बहुतांश तरुण आणि अविवाहित

रेडी टू ईट (खाण्यास तयार असलेलं) स्नॅक्सची आवड आता कुटुंबांमध्येही रुजु होत असल्‍याचे दिसते. देशातील अर्ध्याहून अधिक पालक स्नॅक्सला लहान जेवण मानतात. एक तृतीयांश पेक्षा जास्त पालकांनी स्नॅक्सला पूर्ण जेवण मानण्यास सुरुवात केली आहे. ३४ टक्के पुरुष आणि ३५ टक्के महिलांनी याचे समर्थन केले आहे. स्नॅक्स खाण्याची सवय इतर अनेक कारणांमुळे लागू शकते. उदा. घरातील जेवण करण्यासाठी असलेली उपलब्धता आणि स्वयंपाकाची सोय. ४४ टक्के भारतीयांच्‍या मते स्वयंपाकी नाहीत अशा कुटुंबांसाठी स्नॅक्स खाण्यास सोपा पर्याय वाटतो, ६० टक्के लोकांचा असा विश्वास आहे की स्नॅक्स खाणारे बहुतेक तरुण आणि अविवाहित लोक आहेत.

गोदरेज टायसन फूड्स लिमिटेडचे (GTFL) सीईओ अभय पारनेरकर यांनी म्‍हटले आहे की, "गोदरेज युम्मीझचा इंडिया स्नॅकिंग रिपोर्ट हा स्नॅक्स आणि मानवी स्वभाव, मुड आणि आहार यावर भर देतो. स्नॅकिंगचा ग्राहक आणि ब्रँड दोघांवरही मोठा प्रभाव पडेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT