Sinusitis Symptoms | ‘सायनुसायटिस’ची लक्षणे आणि तपासण्या 
आरोग्य

Sinusitis Symptoms | ‘सायनुसायटिस’ची लक्षणे आणि तपासण्या

पुढारी वृत्तसेवा

डॉ. प्रिया पाटील

सायनुसायटिस म्हणजे नाकाच्या आणि चेहर्‍याच्या हाडांमधील पोकळीला येणारी सूज होय. सायनुसायटिस हा फार सामान्य आजार आहे, तसेच हा सर्व वयोगटांमध्ये बघायला मिळतो.

पॉरानेझल म्हणजे नाकाच्या बाजूला किंवा सभोवती कवटींच्या हाडांमध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या.

या नाकातून येणारी हवा ओली व उबदार ठेवण्यास मदत करतात. तसेच एक पातळ द्रव तयार करतात. त्यामुळे नाकातील धूळ आणि जंतू बाहेर अडवण्यास मदत होते. जेव्हा या पोकळ्यांना जंतुसंसर्ग म्हणजे इन्फेक्शन होतो, किंवा त्यांचा मार्ग बंद होतो तेव्हा तेथे सूज येते या परिस्थितीला सायनुसायटिस म्हणतात.

त्याचे चार प्रकार म्हणजे फ्रंटल सायनस, मॅक्झिलरी सायनस, एथमॉइड सायनस आणि स्फेनॉइड सायनस.

सायनुसायटिस होण्याची प्रामुख्याने खालील कारणेआहेत.

- संसर्ग : जसे की सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळेसुद्धा सायनसला सूज येऊ शकते.

- बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सायनसमध्ये सूज राहते.

- अ‍ॅलर्जीक म्हणजे धूळ, परागकण किंवा प्रदूषणाची अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तीमुळे.

- नाकांचे हाड वाकडे असणे. यामुळे हवेचा मार्ग अडवला जातो. त्यामुळे सायनसेस ब्लॉक होतात.

- नाकाच्या आत लहान गाठ किंवा मास वाढल्यामुळे सायनस चा मार्ग बंद होऊ शकतो.

लक्षणे

कपाळ, डोळे आणि गालाच्या भागात जडपणा किंवा वेदना जाणवते. खाली वाकल्यावर हे दुखणे वाढते. नाकातून घट्ट पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्राव येतो, स्रावाच्या रंगावरून किंवा लक्षणे किती दिवसांची आहेत हे समजलं की, आजार जुनाट किंवा अल्प वेळेचा आहे का, हे समजते.

- नाक चोंदणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.

- वासाची जाणीव कमी होणे.

- अंगात कणकण वाटणे किंवा ताप येणे. विशेषता रात्रीच्या वेळी नाकातील पाणी घशात उतरल्यामुळे खोकला येतो.

दात दुखी : वरच्या बाजूच्या दातांमध्ये वेदना जाणवते.

लक्षणांच्या कालावधीनुसार तीव्रता : अल्पकालावधी म्हणजे काही दिवस ते चार आठवडापर्यंत असते. तर क्रॉनिक सायनुसायटिस हा सामान्यत: 12 आठवड्यांच्या पेक्षा जास्तीचा कालावधी राहिला तर त्याला क्रोनिक सायनुसायटिस म्हणतात. तीव्र कालावधी असणारे सायनुसायटिस हे वेदनांचे प्रकार, ठिकाण म्हणजे कपाळ डोळे किंवा गालामध्ये दुखणे, नाकातून येणारा स्राव कसा आहे, त्याचा रंग, जाडी, वास यावर ठरते. फ्रंटल सायनसेस मध्ये कपाळावर दुखते. चेहर्‍यावरील तपासणीमध्ये डॉक्टर बोटांनी सायनेसच्या भागावर म्हणजेच कपाळावर किंवा गालावर हळुवारपणे दाब देऊन वेदना आणि सूज तपासतात.

पॉलीप्स म्हणजे नाकात किंवा सायनसमध्ये वाढलेले मांस तपासले जाते. इमेजिंन तपासण्यांमध्ये सीटीस्कॅन, एक्स-रे किरणांचा वापर करून सायनस आणि चेहर्‍यांच्या हाडांच्या क्रॉस सेक्शनल तपासणीवर सायनच्या मार्गातील नेमका अडथळा कुठे आहे हे कळते. नेझल एंडोस्कोपी ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावी. तसेच प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये रक्ताच्या तपासण्या, अ‍ॅलर्जी टेस्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावी.

घरगुती उपचारांमध्ये दिवसभर भरपूर पाणी प्यावे, ज्यामुळे कफ पातळ होण्यास मदत होते. दररोज गरम पाण्याची वाफ घ्यावी. पाण्यामध्ये निलगिरीचे तेल टाकू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT