आजच्या काळात काम करणाऱ्या बहुतांश लोकांचा दिवस सूर्योदयाआधीच सुरू होतो आणि तो रात्रीच्या जेवणानंतरही संपत नाही. या सगळ्यात आरशासमोर उभं राहून तासभर त्वचेची काळजी घेणं शक्यच वाटत नाही. मग काय करावं?
एक गोष्ट, निरोगी त्वचा राखण्यासाठी नेहमीच मोठ्या, खर्चिक रुटीनची गरज नसते. लहान-सहान, सातत्याने केलेले प्रयत्न रोजच्या जीवनात सहज मिसळले तरी पुरेसे ठरतात. यासाठी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करा. हलका क्लींझर, तुमच्या त्वचेला शोभणारा मॉइश्चरायझर आणि बाहेर पडताना विश्वासार्ह सनस्क्रीन-ही तीन साधी पावले बहुतांश काम पूर्ण करतात. एखाद्या सकाळी वेळ कमी असेल, तर आपला मॉइश्चरायझर दोन टप्पे एकत्र करतो. पर्समध्ये किंवा बॅगेत फेस वाईप्स ठेवा. प्रवासानंतर किंवा मिटिंगनंतर चेहरा पुसल्यावर येणारी ताजेतवानी भावना दिवसभराचा थकवा पुसून टाकते. शरीरात काय जातंय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. व्यस्त दिनक्रमात कॉफीच्या कपांवर कप, सहज मिळेल ते स्नॅक्स खाण्याची सवय लागते.
थोडीशी तयारी केल्यास मात्र चित्र बदलतं. टेबलवर पाण्याची बाटली ठेवा आणि ती खरंच संपवा. मधल्या वेळच्या पेस्ट्रीऐवजी फळं, सुका मेवा खा. त्वचेला हवी असलेली चमक क्रीमपेक्षा चांगल्या पाण्याने आणि भरगच्च भाज्यांनीच मिळते. पेशींना पोषण मिळालं की, त्याचं तेज चेहऱ्यावर दिसतं. झोप हे आणखी एक दुर्लक्षित सौंदर्य उपचार आहे. रोज सात-आठ तास जमलं नाही, तरी सहा-सात तासांची नियमित झोप त्वचेचा थकवा कमी करते, डोळ्याखालची काळी वर्तुळे हलकी करतो. पूर्ण झोप शक्य नसेल, तर आठवड्याच्या शेवटी वीस मिनिटांची झोप मन आणि त्वचा दोघांनाही विश्रांती देते.
तणाव मात्र चेहऱ्यावर लगेच उमटतो. ताणलेले जबडे, डोळ्याभोवतीचा फिकटपणा, अचानक आलेले पिंपल्स-त्वचा काही लपवत नाही. मिटिंगपूर्व काही सेकंद श्वास खोलवर घेणं, खिडकीपाशी उभं राहणं किंवा थोडंसं ट्रे चिंग करणं तणाव कमी करून संपूर्ण दिवस हलका करू शकतं. आपल्या सभोवतालच्या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. सतत सुरू असलेला एसी त्वचेला आता खेचतो, स्क्रीन टाईम डोळे थकवतो, न धुतलेलं उशीचं कव्हर त्वचेला त्रास देतं. डेस्कवर झाड लावणं, जवळ पाण्याचा ग्लास ठेवणं, उशीची खोळ वेळेवर बदलणाऱ्या छोट्या बदलांनी त्वचेचं आरोग्य जपलं जातं.
खरं म्हणजे, त्वचेची काळजी म्हणजे चैनीचा विषय नाही. हा आपल्या शरीराचा, स्वतःच्या आरोग्याचा आदर करण्याचा एक प्रकार आहे. दिवस संपल्यावर चेहरा धुणं, तिसऱ्या कॉफीऐवजी पाणी पिणं या छोट्या कृती मनात नकळत सांगताहेत की, कोणत्याही महागड्या क्रीमपेक्षा ही जाणीव जास्त मूल्यवान आहे. वेळ नेहमीच कमी वाटेल; पण काही जागरूक सवयी पुरेशा आहेत. त्वचा ताजीतवानी आणि आत्मविश्वासपूर्ण ठेवण्यासाठी सुंदर, निरोगी त्वचा ही आठवड्याच्या शेवटाला करायची गोष्ट नाही. ती दररोजच्या सातत्याची शांत कृती आहे.