अस्थमा रुग्णांची दिनचर्या Pudhari Photo
आरोग्य

अस्थमा रुग्णांची दिनचर्या कशी असावी? जाणून घ्या सविस्तर

अस्थमा फार मोठा आजार नाही

पुढारी वृत्तसेवा
डॉ. भारत लुणावत

अस्थमा हा फार मोठा आजार नाही. श्वासोच्छ्वासाच्या मार्गात काहीतरी अडथळा निर्माण होऊन श्वासोच्छ्वास करण्यासाठी कठीण होणे म्हणजे दमा उसळणे होय. दमा उसळला की रुग्णाला धाप लागते. उथळ व जलद श्वासोच्छ्वास सुरू होतो.

अस्थमा या जीर्ण श्वास विकारात अधूनमधून धाप लागते. विशेषत: उच्छवासास त्रास होतो. याचा हल्ला एकाएकी सुरू होतो. पाच मिनिटांपूर्वी बर्‍या स्थितीत असलेल्या माणसाला एकाएकी धाप सुरू होते. श्वास वाहिन्याचे स्नायू एकाएकी आकुंचित झाल्याने व त्यांचे अस्तर सुजल्याने ही लक्षणे सुरू होतात. श्वासोच्छ्वासासाठी त्याला उच्छवास करण्यास लागणार्‍या सर्व स्नायूंची मदत घ्यावी लागते. खोकला येतो व छातीत सू सू आवाज सुरू होतो. अवघ्या काही तासांपासून तर काही दिवसांपर्यंत हा आवेग टिकू शकतो. तसेच तो परत कसा उद्भवेल याचाही नेम नसतो.

दम्याच्या रुग्णांनी अशी ठेवावी दिनचर्या

* रोज सकाळी वमन करावे. तसेच आपल्या शरीराची व तोंडाची स्वच्छता करावी.

* मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. प्राणायाम, लंग व्हायटलायझरच्या साहाय्याने श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करावा. योगासने करावीत.

* सकाळ, सायंकाळ डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.

* रात्री झोपताना गरम पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून बसावे.

* नाकाची स्वच्छता राखावी.

* प्रत्येक जेवणानंतर दात घासावे व जीभ स्वच्छ करावी.

* धुम्रपान करू नये.

* उग्र दर्प असलेल्या वस्तूपासून दूर राहावे.

* अधिक धावू नये, त्याऐवजी हळूहळू चालावे.

* अ‍ॅस्पिरिनयुक्त औषधे पोटात घेऊ नये.

* दारू, थंड पेय, तळीव पदार्थ, आंबट पदार्थांचे सेवन कधीच करू नये.

* दिवसातून अधिकाधिक पाणी प्यावे.

* रात्रीचे जेवण मात्र हलके घ्यावे व ते सूर्यास्तापूर्वी करावे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT