Root Canal
Root Canal  File photo
आरोग्य

Root Canal | किडलेल्या दातांसाठी रूट कॅनल ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अंजली साळुंखे

जोपर्यंत किडलेला दात किंवा दाढ दुखत नाही, तोपर्यंत रुग्ण दंतवैद्यकाकडे जाणे टाळतात. पण, जेव्हा दंतदुखी असह्य होते, अन्न खातानाच नव्हे, तर पाणी पितानाही दातांमधून कळा येऊ लागतात, रात्री झोपही लागेनाशी होते तेव्हा मग उपचारांसाठी दंतवैद्यकाकडे धाव घेतली जाते. अशा किडलेल्या दातांसाठी रूट कॅनल ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी ठरते.

बदलत्या जीवनशैलीचा सर्वांत मोठा आणि प्रतिकूल परिणाम हा आहार-विहारावर होत असून, यामुळे अत्यंत कमी वयामध्ये विविध व्याधी जडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये तोंडाचे, दातांचे आरोग्य याबाबत तर मोठ्या प्रमाणावर अनास्था दिसून येते. सकाळी उठल्यानंतर कसे बसे दात घासले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असा गैरसमज बहुतांश लोकांमध्ये दिसून येतो.

परंतु, बदलत्या काळात आहार-विहाराच्या सवयी बदलल्या असून, जंक फूड, फास्ट फूड, कोल्ड्रिंक, विविध प्रकारच्या मिठाया, चॉकलेटस्, खारवलेले पदार्थ यांचे सेवन दशकभरापूर्वीच्या तुलनेत जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. या सर्वांचे शरीरावर तर प्रतिकूल परिणाम होतातच; पण दातांसाठीही हे पदार्थ अत्यंत हानिकारक ठरतात.

कार्बोनेटेड पेयांमुळे, कृत्रिम शर्करेचे अतिप्रमाण असणारी चॉकलेटस सतत खाल्ल्यामुळे दातांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. दातांची नियमित स्वच्छता न केली गेल्यामुळे, दिवसभर वेफर्स, कोल्ड्रिंक्स, मद्यपान, तंबाखू, मद्यपान यांचे सेवन केल्यामुळे मौखिक आरोग्याला बाधा येते. खरे पाहता, दात ही मानवाला मिळालेली देणगी आहे;

पण बहुतेकांना त्याचे मोलच समजलेले नाहीये. त्यामुळेच लहान मुलांपासून ते प्र प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटातील मुले, महिला, पुरुष यांच्यामध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जोपर्यंत किडलेला दात किंवा दाढ दुखत नाही, तोपर्यंत रुग्ण दंतवैद्यकाकडे जाणे टाळतात; पण जेव्हा दंतदुखी असह्य होते, अन्न खातानाच नव्हे, तर पाणी पितानाही दातांमधून कळा येऊ लागतात, रात्री झोपही लागेनाशी होते तेव्हा मग उपचारांसाठी दंतवैद्यकाकडे धाव घेतली जाते.

अशा किडलेल्या दातांसाठी रूट कॅनल ही उपचारपद्धती अत्यंत प्रभावी ठरते. ही पद्धती सर्वत्र वापरली जाते; परंतु त्यासाठी रुग्ण टाळाटाळ करतात. याचे कारण पारंपरिक पद्धतीमध्ये रूट कॅनल करण्यासाठी बरेचदा डेंटिस्टकडे जावे लागते. तसेच या पद्धतीनुसार उपचार करताना वेदनाही सहन कराव्या लागतात.

याशिवाय रूट कॅनल सुरू असेपर्यंत खाण्यापिण्याचे पथ्यही पाळावे लागते. त्यामुळे रुग्णांकडून यासाठी चालढकल केली जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आता या सर्व त्रासातून, कटकटीतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता वेदनारहित रूट कॅनल करण्याची पद्धत विकसित झाली असून, त्याचा फायदाही अनेक रुग्णांना होत आहे.

पेनलेस पद्धतीमध्ये तात्पुरती भूल देऊन दातांच्या मुळाच्या टोकापर्यंत जाऊन स्वच्छता केली जाते. तसेच आत निर्माण झालेली पोकळीही भरता येऊ शकते. इतकेच नव्हे तर त्यावर कॅप बसवल्यामुळे दात अगदी पूर्वीसारखे होतात. ही कॅप प्रामुख्याने मेटल किंवा सिरॅमिकपासून बनवलेली असते. त्यामुळे आता पूर्वीसारखे रूट कॅनल करण्यासाठी सतत डेंटिस्टकडे जाण्याची गरज राहिलेली नाही.

आपले दात पृष्ठभागावर घन असतात; परंतु त्यांची त्वचा अतिशय संवेदनशील असते. दातांच्या बाहेरील आवरणाला इनॅमल म्हणतात. यामुळे दातांचे संरक्षण होत असते. त्याच्या आतील बाजूस कमी घनता असणारा एक थर असतो. त्याला डेंटिन म्हणतात. त्याच्याही आतमध्ये एक भाग असतो त्याला पल्प म्हणतात. या पल्पमध्ये अनेक पेशी, तंतू, तसेच मेंदूला वेदनांचे संदेश पाठवणाऱ्या नसा आणि रक्तवाहिन्या असतात.

दातांना लागलेली कीड जेव्हा इनॅमलच्या थरातून त्याच्या आतल्या डेंटिनच्या थरापर्यंत पोहोचते तेव्हा गार वा गरम अन्नपदार्थ खाताना वेदना होऊ लागतात. या दातावर वेळीच उपचार न केल्यास ती कीड दाताच्या 'पल्प'च्या भागापर्यंत पोहोचते. अशा वेळी 'रूट कॅनल' इलाज करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. रूट कॅनल केल्यामुळे दात काढून टाकण्याची वेळ येत नाही. कॅनल झालेला दात वेदनारहित असल्यामुळे पूर्वीप्रमाणे आपण अन्न चावण्यासाठी त्यांचा वापर करू शकतो.

बरेचदा लहान मुलांचे किडलेले दात काढल्यास येणारे पक्के दात हे वेडेवाकडे येण्याची भीती असते. पण, लहान मुलांसाठीदेखील ही वेदनारहित आणि एकाच व्हिजिटमध्ये पार पडणारी रूट कॅनल पद्धती फायदेशीर ठरू शकते. अत्याधुनिक तंत्रामुळे एका तासात ही प्रक्रिया पार पडू शकते. एखाद्या अपघातामध्ये किंवा चालताना-खेळताना पडल्यामुळे किंवा मार लागल्यामुळे एखादा दात तुटला असेल, तर तोही अगदी पूर्ववत करता येणे शक्य झाले आहे.

SCROLL FOR NEXT