कोल्हापूर : भारत हा जगामध्ये रेबीज या रोगाची 'कॅपिटल' आहे. कारण जगातील सर्वात जास्त रेबीज होऊन पेशंट दगावण्याचे प्रमाण भारतात सर्वात अधिक आहे. आज जागतिक रेबीज दिन म्हणून (२८ सप्टेंबर) साजरा केला जातो. रेबीज या विषाणूजन्य आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून या दिवसाचे महत्व आहे. भारतात रेबीजची बहूतेक प्रकरणे कुत्रा चावल्यामुळे होतात; पण मांजर, वटवाघुळ, लोमडी, रॅकून इ. प्राणीही कारणीभूत ठरतात.
जगभरात प्राणीप्रेमी आहेत. त्यात कुत्रा पाळणे ही अनेकांची हौस असते. रेबीज हा प्रामुख्या कुत्र्यांच्या व इतर नखे असलेल्या प्राण्याच्या लाळेतून पसरतो. रेबीज हा प्राणघातक विषाणूजन्य आजार आहे, जो प्रामुख्याने संक्रमित कुत्रा किंवा इतर प्राण्यांच्या लाळेतून पसरतो. एकदा रेबीजची लक्षणे दिसू लागली की रुग्ण वाचणे जवळजवळ अशक्य असते, त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.
नखे ओरबडल्याचे निमित्त....
नुकतेच गुजरातध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचा रेबीजमुळे मृत्यू झाला. या पोलिसही श्वानप्रेमी त्याने जर्मन शेफर्ड या जातीचा कुत्रा पाळला होता. काही दिवसांपूर्वी त्या कुत्र्याचे नख त्याला लागले. पण त्याने दुर्लक्ष केले कारण त्याच्या कुत्र्याला नियमितपणे ॲन्टी रेबीजचे लसीकरण केले जात होते. पण याने नख लागल्यावर स्वतः लस घेतली नाही परिणामी त्याचा तडफडून मृत्यू झाला. हे एक उदाहरण त्याचबरोबर राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेता आणि प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 22 वर्षीय ब्रिजेश सोलंकी याचा रेबीजमुळे जुलै महिन्यात मृत्यू झाला. त्याच्या शेवटचा व्हिडीओत त्याची झालेली अवस्था अंत्यत भयावह आहे.
भारतातील रेबीजने मृत्यू होण्याचे प्रमाण ५ हजाराच्यावर
एका अलीकडील देशव्यापी सर्वेक्षणानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 5,000–6,000 दरम्यान (अंदाजित आकडा )मृत्यू रेबीजमुळे होतात. दर भारतात दरवर्षी. भारतात दरवर्षी सुमारे 9.1 million (91 लाख) प्राणी चावण्याच्या घटना होतात (सर्व प्रकारचे प्राणी, जास्त प्रमाण कुत्र्यांचे). भारताचे रेबीज मृत्यूंचे सुमारे 35–36 % इतके प्रमाण असल्याचे मानले जाते. तर जागतिक स्तरावर दरवर्षी अंदाजे 59,000 लोक रेबीजमुळे मृत्यू पावतात. असे WHO च्या एका अहवालात म्हटले आहे या पैकी सुमारे 95 % घटना आशिया आणि आफ्रिका खंडात होतात.
रेबिज होऊ नये यासाठी काय करावे
रेबीज हा पाळीव प्राण्यांच्या मुख्यता चावण्यात अथवा ओरबाड्यातून होत असतो. यामुळे काही काळजी घेणे गरजेचे आहे. रेबीज होऊच नये यासाठी प्री एक्स्पोजर प्रॉफेलिक्स (Pre - Exposer Prophylaxis) या लसीचे तिन डोस दिले जातात. यामुळे भविष्यात कुत्रा चावण्याची घटना घडलीच तर रेबीज होण्याचा धोका कमी असतो. भारतात रेबीजची बहूतेक प्रकरणे कुत्रा चावल्यामुळे होतात, पण मांजर, वटवाघुळ, लोमडी, रॅकून इ. प्राणीही कारणीभूत ठरतात.
काय काळजी घ्याल
कुत्रा किंवा एखाद्या प्राण्याने चावल्यावर पुढील काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे
जखम त्वरित धुणे – चावलेल्या जागी १५ मिनिटे स्वच्छ पाणी व साबणाने धुवा. यामुळे विषाणूंची संख्या कमी होते.
जंतुनाशक वापरा – साबणाने धुतल्यानंतर पॉव्हिडोन आयोडीन किंवा स्पिरिट/अल्कोहोल लावा.
जखम झाकू नका – घट्ट पट्टी बांधू नये; जखम उघडी ठेवावी.
तत्काळ डॉक्टरांकडे जा – शक्य तितक्या लवकर जवळच्या दवाखान्यात जा.
लसीकरण
डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज लस (Anti-Rabies Vaccine - ARV) आणि गरज असल्यास रेबीज इम्युनोग्लोब्युलिन (RIG) घ्यावी. ठरलेल्या तारखांना डोस घेणे अत्यावश्यक आहे.
कुत्र्याची माहिती ठेवा – शक्य असल्यास कुत्रा मालकीचा आहे का, त्याला लस दिली आहे का, हे जाणून घ्या.
गंभीर जखम असल्यास – रक्तस्त्राव, खोल चावा किंवा डोक्यावर/चेहऱ्यावर चावा असल्यास उपचार तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
लक्षात ठेवा: रेबीज झाल्यावर उपचार नाहीत, पण वेळेवर घेतलेले लसीकरण आयुष्य वाचवते. त्यामुळे कुत्र्याने किंवा इतर प्राण्याने चावल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ योग्य वैद्यकीय उपचार घ्या.
रेबीज का होतो?
तज्ज्ञ म्हणतात, संक्रमित प्राण्यांच्या लाळेतील रॅबडो व्हायरसव्दारे पसरणारा रेबीज हा गंभीर आजार आहे. जो की कुत्रे, मांजरी आणि माकडांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. बहुतांश म्हणजेच तब्बल 95 ते 99 टक्के प्रकरणांमध्ये रेबिजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो. भटके कुत्रे असतील किंवा पाळीव श्वान त्यांना रेबिजची लस दिलेली नसेल आणि तो संक्रमित होऊन जेव्हा कुणाचा चावा घेतो तेव्हा रेबिजसारखा गंभीर आजार होण्याचा धोका अधिक असतो. रेबीजमुळे मृत्युमुखी पडणार्यांची संख्या वाढली आहे. लसीकरण करून रेबिजचा धोका कमी करता येतो, असेही तज्ज्ञांनी सांगितले.