Premature Baby Brain development  
आरोग्य

Premature Baby | प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो 'असा' परिणाम

प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची अनेक कारणं असू शकतात.

shreya kulkarni

प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजेच नियोजित वेळेपेक्षा आधी म्हणजे 37 आठवड्यांपूर्वी झालेली डिलिव्हरी. अशा वेळेपूर्वी जन्मलेली बाळं अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जातात. डॉक्टरांच्या मते, अशा बाळांचा मेंदू पूर्णपणे विकसित झालेला नसतो, त्यामुळे त्याच्या मेंदूच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

(Premature Baby Brain development)

प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे कारणे

प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची अनेक कारणं असू शकतात. गर्भवती महिलेला जर डायबेटिस, उच्च रक्तदाब (हाय बीपी), किडनीशी संबंधित आजार, किंवा गर्भाशयाचे संक्रमण (UTI) असेल, तर वेळेपूर्वी प्रसव होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, धूम्रपान, मद्यपान, पौष्टिक आहाराची कमतरता, तसेच एकाहून अधिक बाळ गर्भात असणे, ही कारणेसुद्धा जबाबदार असू शकतात.

वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांवर होणारा परिणाम

डिलिव्हरी वेळेपूर्वी झाल्यामुळे बाळाच्या शरीरातील हृदय, मेंदू आणि इम्युन सिस्टिम पूर्णतः विकसित झालेली नसते. त्यामुळे अशा बाळांना न्यूरोलॉजिकल समस्या, म्हणजेच स्मरणशक्ती कमी असणे, अभ्यासात मागे राहणे, अशा समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने अशा बाळांना वारंवार सर्दी, ताप, इन्फेक्शन यांचा त्रास होतो. सतत आजारी पडल्यामुळे त्यांच्या शिक्षण आणि करिअरवरही परिणाम होऊ शकतो.

उपाय आणि काळजी

प्रीमॅच्युअर बाळांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी योग्य काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा बाळांना स्पेशल डाएट देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आहारात आयरन, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असावा. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि शिकण्याची क्षमता वाढते.

अशा बाळांना ‘कंगारू केअर’ म्हणजेच त्वचेला त्वचेचा संपर्क (Skin to Skin Contact) आवश्यक असतो. यामुळे बाळाला मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळतो. तसेच त्यांना सकारात्मक, बौद्धिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, योग्य मार्गदर्शन देणे हे आवश्यक आहे.

बाळाचं भविष्य

तज्ज्ञांच्या मते, जरी प्रीमॅच्युअर बाळं आरंभी अधिक कमकुवत असली, तरी योग्य काळजी आणि पोषण दिल्यास ती पूर्णपणे निरोगी आणि सामान्य आयुष्य जगू शकतात. योग्य उपचार, नियमित तपासण्या, आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे अशा बाळांचे भविष्य उज्वल होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT