बॅडमिंटन खेळा, तंदुरुस्त राहा pudhari photo
आरोग्य

बॅडमिंटन खेळा, तंदुरुस्त राहा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. राजेश जोशी

शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी असंख्य पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाने जिममध्येच जाऊन घाम गाळून व्यायाम करायला हवा, असे बिलकूल नाही.

जॉगिंग, योगासने यासह विविध प्रकारचे खेळ खेळूनही आपला फिटनेस चांगला राखता येणे शक्य होते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, बॅडमिंटन हा खेळ शरीराला सर्वांगीण व्यायाम देणारा आहे. घरी किंवा बागेत थोडावेळ बॅडमिंटन खेळूनही आपण तंदुरूस्त राहू शकतो. बॅडमिंटन खेळताना संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. त्यामुळे हा खेळ अत्यंत आरोग्यदायी आहे.

बॅडमिंटन खेळताना धावणे, पळणे, उड्या मारणे, सूर मारणे, हात आणि पाय वेगाने हलवणे या सर्व क्रिया केल्या जातात. शरीरात जमा झालेली चरबी कमी होऊ लागते. एक तास बॅडमिंटन खेळून तब्बल 450-500 कॅलरीजपर्यंत चरबी घटू शकते. रोज तीस ते चाळीस मिनिटे बॅडमिंटन खेळण्यास स्नायू मजबूत होतात आणि शरीराची ठेवण चांगली राहते.

आपल्या शरीरात मेंदूनंतर 3 महत्त्वाचे अवयव असतात ते म्हणजे यकृत, मूत्रपिंड आणि हृदय. बॅडमिंटन खेळताना शरीरातील रक्ताभिसरण उत्तम होत असल्यामुळे या अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पुरेशा प्रमाणात पोहोचते. हृदयरोगाचा धोकाही कमी होतो, कारण धमन्यांमध्ये जमा झालेले प्लाक निघून जाते.

बॅडमिंटन खेळताना आपण शारीरिकच नव्हे, तर मानसिक रूपाने कार्यशील होतो. प्रतिस्पर्ध्याला झुंज देणे आणि उत्तम शॉट मारणे, शटल निर्धारित रेषेबाहेर जाऊ न देणे यासारख्या गोष्टींसाठी मेंदूचा वापर करावा लागतो. मेंदूचे स्नायू शिथिल होतात आणि मानसिक तणाव कमी होतो. बॅडमिंटन खेळल्याने आपली हाडे मजबूत होतात. शारीरिक हालचालींमुळे हाडांची निर्मिती होणार्‍या पेशी विकसित होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT