पालकांनो...! कडक उन्हाळा, परीक्षेच्या काळात 'अशी' घ्या मुलांची काळजी (AI Photo)
आरोग्य

पालकांनो...! कडक उन्हाळा, परीक्षेच्या काळात 'अशी' घ्या मुलांची काळजी

Parenting Tips | परीक्षेच्या काळात मुलांचे आरोग्य जपणे खूप गरजेचे

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Parenting Tips | कडक उन्हाळा आणि परीक्षेचा ताण मुलांची दमछाक करणारा असतो, त्यामुळे पालकांनी या काळात मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. परीक्षेच्या काळात मुलांचं शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवणं खूप गरजेचं असतं. यासाठी मुलांना योग्य आहार दिल्यास लक्ष केंद्रित करणं, स्मरणशक्ती आणि ऊर्जा टिकवण्यास मदत होते. पालकांनो कडक उन्हाळ्यात परीक्षेदरम्यान तुमच्या मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी...

Parenting Tips | मुलांना स्मरणशक्ती वाढवणारा आहार द्या

  • सुकामेवा : बदाम, अक्रोड, खजूर – हे मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर असतात.

  • बीजं : जवस, चिया सीड्स यामध्ये ओमेगा-३ असते जे मेंदूसाठी उपयुक्त आहे.

ऊर्जा देणारा सकाळचा नाश्ता द्या

  • मुलांना रोज सकाळी नियमित वेळेत नाश्ता द्या.

  • नाश्ता काय द्यावा : पोहे, उपमा, अंड्याचं आमलेट, फळं, दूध किंवा ड्रायफ्रूट्स घालतेला शिरा.

दुपारचं जेवण – हलकं आणि पोषक

  • आहार पचायला हलका पण पोषणमूल्ययुक्त असावा.

  • घरगुती जेवण द्या : वरण-भात, चपाती, भाजी, कोशिंबीर.

स्नॅक्ससाठी 'हे' आहेत हेल्दी पर्याय

  • फळांचे तुकडे, मखाणे, पीनट बटर ब्रेड, घरगुती शेंगदाण्याची चिक्की.

  • भरपूर पाणी व थंड पेये

  • मुलं अभ्यास करताना पाणी पित नाहीत, त्यामुळे आठवण करून द्या.

  • लिंबूपाणी, ताक, ओआरएस, नारळपाणी हे उत्तम पर्याय आहेत.

'हे' पदार्थ टाळावेत

  • भर उन्हामध्ये चिप्स, कोल्ड ड्रिंक्स टाळा.

  • जास्त साखर व जंक फूड टाळा, त्यामुळे सुस्ती आणि थकवा येतो.

  • जास्त चहा-कॉफी यामुळे झोप कमी होते पण चिडचिड होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT