कधी कधी सर्वात साध्या सवयीच आरोग्यावर सर्वात मोठा प्रभाव टाकतात. त्यापैकीच एक सवय म्हणजे रिकाम्या पोटी पपई खाणे.
साधे दिसणारे, नारिंगी रंगाचे पपई हे फळ बहुतेकदा नाश्त्याच्या टेबलवर किंवा फळांच्या बशीत शांतपणे पडलेले असते; पण खरे तर ते तुमच्या शरीराचा खरा मित्र ठरू शकते. विशेषतः दिवसाची सुरुवात करताना ते खाल्ले तर. बरेच आहारतज्ज्ञ यावर भर देतात आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनीही याविषयी लिहून ठेवलेले आहे.
रात्री झोपताना आपलं शरीर दुरुस्ती आणि डिटॉक्स मोडमध्ये जातं. साहजिकच, सकाळी, शरीर तयार असतं विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला मदत होते. पपईत भरपूर पाणी आणि पपेन नावाचे एन्झाइम असतो. ते शरीरातील अपशिष्ट पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. ही प्रक्रिया म्हणजे जणू आपल्या पोटाला दररोज एक छोटंसं स्पा सेशन मिळणं!
बरेचदा, जेवणानंतर फुगल्यासारखं वाटतं, जडपणा किंवा सुस्ती येते, तेव्हा पपई खूप उपयोगी पडते. पपेन एन्झाइम प्रथिनं तोडून त्याचं पचन सोपं करतो. दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी पपईने केल्यास पचनसंस्था व्यवस्थित काम करते आणि बद्धकोष्ठता किंवा अॅसिडिटीसारख्या समस्या नैसर्गिकरीत्या कमी होतात, गोळ्या घेण्याची गरज पडत नाही.
त्वचेचे आरोग्य तुमच्या आतून (पचनसंस्थेपासून) चांगले असले पाहिजे. पपईत व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. ते कोलाजेन उत्पादनाला चालना देतात आणि त्वचेला हानी करणार्या फ्री-रॅडिकल्सशी लढतात. सकाळची पपईची सवय दीर्घकाळ टिकल्यास पिंपल्स कमी होतात, त्वचा मऊ होते आणि नैसर्गिक चमक वाढते, जी तुमच्या महागड्या मॉइश्चरायझरपेक्षाही जास्त प्रभावी ठरू शकते!
पपईमध्ये व्हिटॅमिन सी विपुल प्रमाणात असते. एक वाटीभर पपई खाल्ल्याने दिवसभरासाठीचे आवश्यक प्रमाण पूर्ण होतं. त्यामुळे इम्युनिटी सिस्टीम बळकट होते. याखेरीज पपईत फोलेट, पोटॅशियम, आणि फायबर असतात, जे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यातील अँटिऑक्सिडंट्स दाह कमी करतात आणि यकृताच्या कार्यक्षमतेस मदत करतात. तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर सकाळी पपई खाल्ल्याने यकृताला नवे बळ मिळते.
पपई नैसर्गिकरीत्या गोड आहे; पण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. याचा अर्थ पपई रक्तातील साखरेचा स्तर झपाट्याने वाढवत नाही. त्यामुळे ती जास्त वेळ पोट भरल्यासारखी भावना देते आणि अनावश्यक खाण्याची इच्छा कमी करते. सर्व फळे रिकाम्या पोटी खाण्यास योग्य नसतात (उदा. संत्री किंवा मोसंबी). पण पपई वेगळी आहे. तिची मृदू रचना आणि सौम्य आम्लता पोटाला त्रास न देता उलट शांत करते. त्यामुळे ती संवेदनशील पचनसंस्थेसाठीसुद्धा सुरक्षित आहे.