नाभीभोवती दुखत असल्यास 
आरोग्य

नाभीभोवती दुखणे! काय आहेत त्याची कारणे?

जाणून घ्या घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा
डॉ. मनोज शिंगाडे

पोटावरील नाभीच्या वरच्या भागात काही वेळा वेदना जाणवतात. अनेकदा ही समस्या कशामुळे उद्भवते याचे आकलन होत नाही. काही वेळा जास्त शारीरिक हालचाली केल्यामुळे किंवा अचानक जड वस्तू उचलल्यामुळे बेंबीच्या वरील भाग दुखू शकतो.

पोटावर अचानक दाब पडल्यामुळेही या भागात वेदना जाणवू शकतात. अशा वेळी गरम पाण्याने शेक घेतल्यास आराम मिळतो; परंतु दररोज या वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही वेळा हे मूतखड्याचे लक्षण असू शकते. तसे असल्यास या वेदना सुरुवातीला कमी तीव्रतेच्या असतात, पण खड्याचा आकार वाढत गेल्यास त्या तीव्र बनतात. त्या इतक्या तीव्र होतात की, रुग्ण अक्षरशः जमिनीवर लोळू लागतात. एवढी टोकाची वेळ येईपर्यंत थांबण्याऐवजी एक-दोन दिवसाहून अधिक काळ डाव्या बाजूला नाभीच्या वरील भागात दाबल्यानंतर किंवा न दाबता वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय पोटात एखादा संसर्ग झाल्याचेही हे लक्षण असू शकते. या प्रकारच्या लक्षणांमुळे अ‍ॅसिडिटी किंवा गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

अपेंडिसाइटिस हे उजव्या बाजूच्या पोटदुखीचे सामान्य कारण आहे. यामध्ये नाभीभोवती वेदना सुरू होते आणि नंतर खालच्या उजव्या बाजूला पसरते. यामध्येही वेदना वाढत जातात. त्यामुळे बेंबी अथवा त्याच्या सभोवतालच्या भागात अचानकपणाने वेदना सुरू झाल्यास घरगुती उपायांमध्ये वेळ न दवडता एकदा वैद्यकीय सल्ला घेणे ईष्ट ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT