सध्या हेल्दी डाएट आणि फिटनेसबाबत जागरूकता वाढल्याने लोक आपली आहारशैली अधिक सजगपणे निवडू लागले आहेत. प्रथिने, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्सचा समावेश डाएटमध्ये होत आहे. मात्र, शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा चांगला स्रोत शोधणं थोडं कठीण असतं. टोफू आणि पनीर हे दोघंही उत्तम प्रथिनांचे स्रोत आहेत.
दिसायला दोघंही सारखे असले, तरी त्यांचं बनवण्याची प्रक्रिया, पोषकतत्त्वं आणि फायदे वेगवेगळे आहेत. चला तर पाहूया टोफू आणि पनीरमधील फरक व कोणतं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
प्रथिनांचा समृद्ध स्रोत:
पनीरमध्ये उच्च प्रमाणात प्रथिने असतात, जे मसल्स वाढवण्यासाठी आणि शरीर मजबुत ठेवण्यासाठी मदत करतात.
हाडे आणि दात मजबूत करतो:
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे आणि दात मजबूत ठेवतात.
ऊर्जा वाढवतो:
पनीरमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीराला त्वरित ऊर्जा पुरवते.
वजन वाढवण्यासाठी उपयोगी:
ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी पनीर हा एक चांगला पर्याय आहे.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो:
पनीरचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तो ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवतो.
मेंटल फोकस सुधारतो:
पनीरमध्ये असणारे काही पोषक घटक मेंदूच्या कार्यक्षमतेला मदत करतात.
दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं:
प्रथिने आणि फॅट्समुळे पनीर खाल्ल्यावर भूक कमी लागते, जे वजन नियंत्रणासाठी मदत करू शकते.
कमी कॅलरी आणि फॅट:
टोफूमध्ये कॅलरी आणि फॅट कमी असतात, त्यामुळे ते वजन कमी करणाऱ्या आहारात उपयुक्त आहे.
हृदयासाठी फायदेशीर:
टोफूमध्ये कोलेस्टेरॉल नसतो, त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
शुद्ध वनस्पतीजन्य प्रथिने स्रोत:
टोफू हे सोयापासून बनते आणि शाकाहारी तसेच व्हेगन लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम पर्याय आहे.
अँटीऑक्सिडंट्सने भरलेले:
यामध्ये Isoflavones नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या पेशींना नुकसानापासून वाचवतात.
हार्मोन्सचं संतुलन राखतो:
टोफूमधील घटक महिलांमध्ये हार्मोनल बॅलन्स राखण्यास मदत करतात, विशेषतः मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती दरम्यान.
पचनासाठी फायदेशीर:
टोफूमध्ये थोडं फायबर असतं, जे पचनसंस्थेला मदत करतं.
लॅक्टोज इन्टॉलरंट लोकांसाठी योग्य:
दूध व दुग्धजन्य पदार्थ सहन न होणाऱ्या लोकांसाठी टोफू एक उत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाला मसल्स वाढवायचे असतील, तर पनीर फायदेशीर ठरेल. पण जर वजन कमी करायचं असेल किंवा कमी फॅट आणि कोलेस्टेरॉलयुक्त पर्याय हवा असेल, तर टोफू अधिक चांगला पर्याय आहे. व्हेगन किंवा लॅक्टोज इन्टॉलरंट लोकांसाठी टोफू एक उत्तम पर्याय ठरतो.