भारतीय स्वयंपाकघरात डाळीला अत्यंत महत्त्व दिलं जातं. आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या या डाळी विविध प्रकारे खाल्ल्या जातात. यातील मूग डाळ ही एक अशी डाळ आहे जी लवकर शिजते, पचायला सोपी असते आणि अनेक जीवनसत्त्वांनी समृद्ध असते जसे की विटॅमिन A, C आणि E.
मात्र, काही लोकांना मूग डाळीची भाजी किंवा पारंपरिक खिचडी रुचत नाही. अशावेळी या डाळीपासून आपण काही हटके, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रेसिपीज तयार करू शकतो. चला तर जाणून घेऊया अशाच ५ उत्तम मूग डाळ रेसिपीज:
मूग डाळीला अंकुर आणल्यास तिची पोषणमूल्ये दुप्पट होतात. यासाठी रात्रीच्या वेळी मूग डाळ, चणे आणि सोयाबीन वेगवेगळ्या वाट्यांमध्ये भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी काढून टाका आणि डाळ थोडीशी ओलसर ठेवून गाठोड्यात किंवा जाळीदार भांड्यात ८ ते १२ तास ठेवा.
अंकुर आलेली डाळ एका भांड्यात काढा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडं काळं मीठ, सैंधव मीठ आणि चाट मसाला मिसळा. हवं असल्यास कोथिंबीर आणि लिंबू रसही घालू शकता. ही चवदार आणि हेल्दी डिश सकाळच्या नाश्त्यासाठी सर्वोत्तम आहे.
मूग डाळीपासून बनवलेले धपाटे म्हणजे भारतीय प्रकारचा पॅनकेक. रात्री मूग डाळ पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ती धुवून, मिक्सरमध्ये घालून त्यात आले, हिरवी मिरची, मीठ आणि थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
तवा गरम करून थोडं तेल शिंपडा. तयार मिश्रण तव्यावर गोलसर पसरा आणि दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. हे धपाटे नारळाच्या चटणीसोबत खूप छान लागते. यामुळे प्रोटीन मिळते आणि पोटही भरते.
मूग डाळ इडली हे दक्षिण भारतीय जेवणातील हेल्दी पर्याय आहे. यासाठी मूग डाळ 3-4 तास भिजवून घ्या. नंतर ती धुवून कमी पाण्यात मिक्सरमध्ये वाटा. एका भांड्यात ही डाळ घ्या. त्यात रवा (सूजी), थोडं दही, मीठ आणि बेकिंग सोडा किंवा इनो टाका.
हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवा. मग इडलीच्या साच्यांमध्ये भरून वाफेवर 12-15 मिनिटं शिजवा. शिजल्यानंतर त्यावर मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरीव मिरची आणि अल्याचा तडका द्या. ही इडली लंच किंवा डिनरसाठी सुद्धा चालते.
रात्री उरलेली मूग डाळ टाकून न देता त्यापासून स्वादिष्ट टिक्की बनवा. एका मोठ्या बाउलमध्ये मूग डाळ घ्या. त्यात बेसन, चिरलेली हिरीव मिरची, अद्रक-लसूण पेस्ट, थोडंसं गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. हे सर्व घटक मिसळून घट्ट मिश्रण तयार करा.
त्याचे छोटे गोळे करून टिक्कीचा आकार द्या आणि गरम तव्यावर थोड्याशा तेलात शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा. चटणी, दही किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केल्यास अधिक चवदार लागतात.
हा सूप सर्दी-खोकल्याच्या दिवसात किंवा पचायला हलकं जेवण हवं असेल तेव्हा उपयुक्त ठरतो. मूग डाळ 20 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. कुकरमध्ये घी गरम करून त्यात जिरं, हिंग, कडीपत्ता, दालचिनी, लवंग यांचं छान तडका द्या.
त्यात चिरलेला कांदा, आले आणि गाजर टाका व परतून घ्या. मग भिजवलेली डाळ, हळद, मीठ आणि एक कप पाणी टाका. २ शिट्ट्या होईपर्यंत प्रेशर कुक करा. थोडं थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटा.
परत एका पॅनमध्ये ते गरम करताना त्यात थोडं पाणी, काळी मिरी पावडर आणि हवं असल्यास लिंबाचा रस घाला. गरमागरम सूप सर्व्ह करा – पौष्टिक, पथ्यकर आणि अतिशय चवदार.