Healthy Diet
जाणून घ्या, पोटाचे आरोग्य सांभाळण्यासाठी कशी असावी आहार आणि दिनचर्या  File Photo
आरोग्य

Healthy Diet| जाणून घ्या, पोटाचे आरोग्य सांभाळण्यासाठी कशी असावी आहार आणि दिनचर्या

shreya kulkarni

अलीकडील काळात पोटाशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातही सर्वाधिक प्रमाण आहे ते गॅसेस, जडपणा, अपचन आणि बद्धकोष्ठता या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे. या सर्वांवर वेळीच इलाज केला पाहिजे; अन्यथा दुसरेच आजार शरीरात ठाण मांडून बसू शकतात.

पोटासंबंधी आजारापासून बचाव करण्यासाठी दिनचर्या जितकी योग्य असली पाहिजे, तितकेच आहारावरही लक्ष दिले पाहिजे. उदा. सकाळची न्याहारी जास्त असली पाहिजे. दुपारचे जेवण त्यापेक्षा कमी, तर रात्रीचे जेवण भुकेपेक्षा कमी असावे. जेवताना कधीही बोलू नये. जेवताना बोलल्यास तोंडावाटे हवा पोटात जाते. त्यामुळे ढेकर येतात.

हेपेटायटिस - यकृताला सूज आली असेल, तर हेपेटायटिस होऊ शकतो. त्यात गंभीर प्रकारातील हेपेटायटिस होण्याचा धोका असतो. सूज आलेली असल्यास तो तीव्र स्वरूपाचा हेपेटायटिस असतो. सहा महिन्यांहून अधिक काळ सूज असेल तर गंभीर स्वरूपाचा हेपेटायटिस असतो. याची प्रमुख कारण आहेत आहारविहार, दूषित पाणी किंवा रक्त, असुरक्षित लैगिंक संबंध आणि इतर कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यक्तीकडून झालेला संसर्ग याच्यापासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि जेवण चावून चावून खावे.

जेवण झाल्यानंतर काही वेळाने झोपल्यानंतर जर घशाशी येत असेल, तर डोक्याच्या बाजूला उशा लावून ती बाजू उंच करून झोपावे. त्यामुळे आराम मिळतो. पोटात वायू होणे - बेंबीच्या भागात जडपणा जाणवते त्याला डिस्पेसिया म्हणतात. या रोगाने पीडित व्यक्तींना स्थूलपणा, अतिवजन, आतड्यांमध्ये अडथळा किंवा त्याची गती कमी होणे इत्यादी गोष्टी जाणवतात. त्याचा बचाव करण्यासाठी जेवणात हलका आहार घ्यावा.

तसेच जेवल्यानंतर लगेच झोपू नये. तसेच खूप मसालेदार जेवण घेऊ नये. इन्टेस्टाईनल ऑब्स्ट्रॅक्शन - गॅस आणि शौचविधीमध्ये त्रास होणे किंवा या दोन्ही क्रिया अचानक बंद होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. या रुग्णांना हिरवी पिवळी उलटी होते. पोटाची एखादी शस्त्रक्रिया किंवा पोटात कृमी झाल्यास ही लक्षणे दिसतात.

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये रेडिओथेरेपीच्या काळात ही समस्या असल्याचे पाहायला मिळते. हार्ट बर्न-छातीत जळजळ - गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीजमुळे छातीत जळजळ होते. त्यामध्ये पाणी आणि पोटातील अन्न ढवळून तोंडात येते. त्यापासून बचाव करण्यासाठी चहा, कॉफी, मिठाई, कोल्ड्रिक्स, चॉकलेट इत्यादी पदार्थ कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत.

एका वेळी अनेक प्रकारचा आहार ग्रहण केल्यास असा त्रास होतो. आयुर्वेदाचा सल्ला पोटाशी निगडीत आजारांपासून बचाव करण्यासाठी दिनक्रमाबरोबरच आहार संतुलित असला पाहिजे. घरात बनवलेला आहारा सेवन करावा.

त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असावे. मोसमी फळांसमवेत हिरव्या पालेभाज्या, चाकवत यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे. सूर्योदयापूर्वी आन्हिके उरकावीत. तसेच नियमितपणे व्यायाम करावा. सकाळ- संध्याकाळ एक आवळा सेवन करावा. पोटाशी निगडीत रोगांपासून दूर राहा.

'या' गोष्टी ठेवा दूर मसालेदार, तळलेले तुपकट, जंक फूड, फास्ट फूड, शिळे पदार्थ आणि धूम्रपान, मद्यपान यापासून स्वतःला दूर ठेवा. ह्या गोष्टी पोटात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो. पोटाशी निगडीत आजार झाल्यास आहारात हिरव्या पालेभाज्या आणि हंगामी फळे यांचा समावेश असावा.

डॉक्टरी सल्ला केव्हा घ्यावा?

■ पोटाच्या वरच्या बाजूस दुखणे आणि रात्रीच्या वेळी वेदना अधिक होणे.

■ जेवणानंतर पोटदुखी होणे, काहींच्या बाबतीत पोटात जळजळणे किंवा अपचन होणे.

■ पोटाच्या आत आतड्यांना छाले किंवा लहान फोड आल्याने खोकताना किंवा शौच करताना रक्त पडणे.

■ खूप काळ थोडी थोडी पोटदुखी असणे.

■ आंबट ढेकर, छातीत जळजळ, अॅसिड अधिक झाल्याने सतत उलटी होणे. कोल्ड्रिक्स, चॉकलेट इत्यादी पदार्थ कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. एका वेळी अनेक प्रकारचा आहार ग्रहण केल्यास असा त्रास होतो. आयुर्वेदाचा सल्ला पोटाशी निगडीत आजारांपासून बचाव करण्यासाठी दिनक्रमाबरोबरच आहार संतुलित असला पाहिजे. घरात बनवलेला आहारा सेवन करावा. त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असावे. मोसमी फळांसमवेत

SCROLL FOR NEXT