Lactose Intolerance Pudhari
आरोग्य

लॅक्टोज इनटॉलरन्समुळे जाणून घ्या होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय

Lactose Intolerance |लॅक्टोज इनटॉलरन्स हा आजार नसला, तरी तो तुम्हाला त्रास देऊ शकतो.

पुढारी वृत्तसेवा

डॉ. मनोज शिंगाडे

दुधात लॅक्टोज नावाची साखर असते. लॅक्टोज इनटॉलरन्स हा आजार नसला, तरी तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. आपल्या शरीरात 'लॅक्टेज' हे एन्झाईम असते जे शरीराला साखर शोषण्यास मदत करते.

हे एन्झाईम लहान आतड्यात असते. काही लोकांमध्ये ते नसते किंवा फारच कमी असते. ज्यांच्याकडे लॅक्टोज कमी आहे त्यांना दुग्धजन्य पदार्थ, अगदी दुधापासून बनवलेली स्वादिष्ट देशी मिठाईही पचवता येत नाही. ज्यांच्यामध्ये लॅक्टोजची कमतरता असते, त्यांच्या लहान आतड्यात दुधातली साखर, लॅक्टोजचे विघटन होऊ शकत नाही.

हे कोलनमध्ये जाऊन तेथील जीवाणूंमध्ये मिसळते आणि किण्वन होते, ज्यामुळे गॅस, ढेकर, जुलाब आणि उलट्या किंवा मळमळल्यासारखे वाटू लागते. लॅक्टोज इनटॉलरन्स कोणालाही होऊ शकतो. जगभरातील लाखो लोकांना विशेषतः प्रौढांना हा त्रास असतो.

यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही की, सुमारे ४० टक्के लोकांमध्ये २ ते ५ वर्षांनंतर लॅक्टोज एन्झाईमचे उत्पादन थांबते किंवा मोठ्या प्रमाणात कमी होते. लॅक्टोज इनटॉलरन्सचा त्रास होत असल्यास दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनानंतर अतिसार, मळमळ, उलट्या, पोटदुखी किंवा लचक भरणे, गॅस आणि ढेकर येणे अशी लक्षण दिसतात.

काही आठवडे दुग्धजन्य पदार्थ खाणे बंद केल्यास ही बाब सहज लक्षात येते. या व्यतिरिक्त हायड्रोजन ब्रेथ टेस्टसारखी चाचणीही करू शकता. यामध्ये तुम्हाला असे पेय पिण्यास सांगितले जाईल, ज्यामध्ये लॅक्टोजचे जास्त प्रमाणात असेल. काही काळानंतर तुमच्या श्वासातील हायड्रोजनचे प्रमाण मोजले जाईल. तुमच्या श्वासोच्छ्वासात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असेल, तर याचा अर्थ तुम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT