लेझी आय' कारणे आणि उपचार  Pudhari
आरोग्य

Lazy Eye Syndrome 'लेझी आय' म्हणजे काय, यावर उपचार आहेत का?

Lazy Eye meaning: लहान मुलांमध्ये ‘लेझी आय’ म्हणजेच आळशी डोळा हा विकार सध्या पाहण्यास मिळत आहे. लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी नेत्रतज्ज्ञांकडून नियमित करून घ्यायला हवी.

पुढारी वृत्तसेवा

What is Lazy Eye Explained

दीपेश सुराणा

पिंपरी : लहान मुलांमध्ये ‘लेझी आय’ म्हणजेच आळशी डोळा हा विकार सध्या पाहण्यास मिळत आहे. या विकाराबाबत लवकर निदान आणि उपचार न झाल्यास दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. शहरातील नेत्रतज्ज्ञांकडे डोळे तपासण्यासाठी येणार्‍या एकूण मुलांपैकी 2 ते 5 टक्के मुलांमध्ये हा विकार पाहण्यास मिळत असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी मांडले आहे.

मुलांमध्ये का उद्भवते समस्या?

मुलांना लहानपणापासून म्हणजे वय वर्ष दहापेक्षा कमी असताना जवळचे किंवा दूरचे स्पष्ट दिसत नसेल आणि तरीही त्यांनी चष्मा वापरला नाही, तर त्यांना दहा वर्षांपुढे लेझी आयची समस्या उद्भवते. त्यांची दृष्टी विकसित होत नाही. एका डोळ्याची दृष्टी चांगली असते. तर, दुसर्‍या डोळ्याची दृष्टी कमी राहते. त्यांचा चष्म्याचा नंबर वाढतो.

लहान मुलांच्या डोळ्यांची तपासणी नेत्रतज्ज्ञांकडून नियमित करून घ्यायला हवी. मुलांना तिरळेपणाची समस्या असल्यास त्यावर उपचार करावे. त्यांना चष्मा लागला असल्यास त्याचा नियमित वापर करावा. महापालिकेच्या अजमेरा कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात डोळ्यांच्या विकारासाठी दररोज तपासणीसाठी येणार्‍या एकूण 300 ते 350 रुग्णांपैकी अंदाजे 4 ते 5 रुग्णांमध्ये लेझी आयचा विकार पाहण्यास मिळत आहे.
डॉ. रुपाली महेशगौरी, नेत्ररोग विभागप्रमुख, नेत्र रुग्णालय, अजमेरा कॉलनी.

लेझी आय होण्याची कारणे :

  • डोळ्यांना दूरचे किंवा जवळचे स्पष्ट दिसत नसल्यास

  • डोळ्यांच्या स्नायूंमध्ये काही समस्या असल्यास

  • लहान मुलांमध्ये मोतीबिंदू झाल्यास

  • तिरका डोळा : दोन्ही डोळे योग्यप्रकारे एकसारखे नसल्यास

लेझी आयची पाच प्रमुख लक्षणे

  • डोळे व्यवस्थित फिरू शकत नाहीत.

  • डोळ्यांना वारंवार चोळावे लागते.

  • डोळे लाल होतात किंवा सुजतात.

  • वस्तू स्पष्ट दिसत नाहीत.

  • एका डोळ्याचाच जास्त वापर करावा लागतो.

हे आहेत लेझी आयवरील उपचार

  • दुर्बळ डोळ्याला अधिक सक्रिय करण्यासाठी चांगल्या डोळ्यावर पॅच (पट्टी) लावतात.

  • डोळ्यांना चष्मा किंवा लेन्स वापरून दृष्टी सुधारता येते.

  • काही विशेष परिस्थितीमध्ये लेझी आयच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया केली जाते.

  • डोळ्याच्या स्नायूंच्या ताकदीसाठी विशेष व्यायाम केले जातात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT