What Is Jeffing For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी अनेक लोकं जॉगिंग किंवा रनिंग व्यायामाचा आधार घेतात. जॉगिंगमुळं फिटनेस वाढतोच. तसेच मानसिकदृष्ट्या देखील त्याचा फायदा होतो. मात्र असं असलं तरी जॉगिंग हा व्यायाम प्रकार तसा कठण आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हा व्यायाम सुरू करतानाच खूप अडचणी येतात.
यावरच आता जेफिंग (Jeffing) हा उपाय सध्या ट्रेंडवर आहे. हे वॉक रन टेक्निक फिटनेसवेड्या लोकांना फार उपयुक्त ठरत आहे. चला तर मग या प्रसिद्ध जेफिंग ट्रेंडबाबत अधिक जाणून घेऊयात.
जेफिंग हा प्रकार चालणे आणि धावणेच्या संमिश्र प्रकार आहे. हा प्रकार ऑलिम्पिक डिस्टन्स रनर जेफ गालोवे यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यांचे नुकतेच २५ फेब्रुवारी रोजी ८० व्या वर्षी निधन झालं. ढोबळमानानं यामध्ये धावणे आणि वेगाने चालणे यांचा समावेश असतो. ठराविक अंतरानं हे दोन्ही प्रकार आलटून पालटून वापरले जातात. यामुळं तुमचा स्टॅमिना वाढतो तसेच दुखापती होण्याचे आणि थकवा येण्याचे प्रमाण देखील घटते.
जेफ यांनी सांगितल्याप्रमाणं जेफिंगमध्ये ३०-३० चा फॉर्म्युला वापरला हातो. यात ३० सेकंद धावणे आणि ३० सेकेंद चालण्याचा समावेश असतो. हे टेक्निक सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. यामुळे धावपटूंना त्यांचा वेग देखील कायम ठेवता येतो तसेच धावण्याचं अंतर देखील वाढता येतं. त्यामुळं स्व स्तरातील लोकांसाठी धावणे अत्यंत सुलभ होऊन जातं.
जेफिंग या संकल्पनेला सोशल मीडिया ग्रुप रन मम्मी रन या ग्रुपने जन्म दिला आहे. हा ग्रुप ज्या मॉम्स धावण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. महिलांच्या आरोग्याबाबत बोलताना एका मुलाखतीत जेफ यांनी, 'या महिलांपैकी काही महिलांनी माझ्या रन वॉर रन पद्धतीचा शोध लावला आणि त्यांनी जेफिंग असं त्याला नाव दिलं. कारण मी याची सुरूवात केली होती. तेव्हापासून रन वॉक रन पद्धतीला जेफिंग हे नाव चिकटलं अन् इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी देखील हेच नाव उचललं. आता हे जगभरात पसरलं आहे.'
तुम्ही धावण्याच्या आणि चालण्याची एक वेळ निवडा. सुरूवातीला तुम्ही ३० सेकंद चालणे त्यानंतर थोडा ब्रेक त्यानंतर ३० सेकंद धावणे अशा प्रकारे ते करू शकता. तुम्ही धावण्याची वेळ हळू हळू ३ मिनिटांवर न्या. तर चालण्याची वेळी १ मिनिटांपर्यंत वाढवा. तुम्ही तुमची लेवल अजून वाढवत ९ मिनिटे धावणे आणि त्यानंतर १ मिनिट चालण्यापर्यंत नेऊ शकता.
चालताना जोपर्यंत श्वास लागत नाही तोपर्यंत थांबू नका.
चालनताना ब्रिस्क वॉकिंगला प्राधान्य द्या
धावताना वेग इतकाच ठेवा की तुम्हाला तुमच्या मित्रासोबत सहज बोलता येईल.
जर दम लागलाच तर धावण्याचा कालावधी कमी करून चालण्याचा कालावधी वाढवा