ब्लॅक लंग्ज डिसिजच्या अंतरंगात Pudhari File Photo
आरोग्य

Black Lung Disease | ब्लॅक लंग्ज डिसिजच्या अंतरंगात

पुढारी वृत्तसेवा
डॉ. संजय गायकवाड

ब्लॅक लंग्ज डिसिजला सीडब्ल्यूपी म्हणजेच कोल वर्कर्स निमोकोनॉयसिस या नावाने ओळखले जाते. एखादी व्यक्ती कोळसा आणि धुळीच्या संपर्कात अधिक येत असेल, तर त्याला अशा प्रकारचा आजार होण्याची शक्यता अधिक राहते.

कोळसा आणि धुळीच्या संपर्कातील व्यक्तीच्या फुफ्फुसात धुळीचे कण जातात आणि श्वास घेण्यास अडचणी येतात. केवळ कोळशाच्या खाणीतच किंवा कोळशाचे काम करणार्‍या लोकांनाच हा त्रास होतो असे नाही. अन्य लोकांतही ही लक्षणे आढळून येतात. हा आजार बळावण्यास अनेक वर्षे लागतात आणि नंतर लक्षणे दिसून लागतात. या आजाराचे प्रकार पाहू या.

लक्षणे : छाती गच्च होणे, श्वास घेण्यास अडचणी येणे, श्वास लागणे, धाप लागणे, नाकात जळजळ होणे, छाती जड होणे, कोरडा खोकला होणे, कोरड्या खोकल्याबरोबरच काळी थुंकी पडणे.

खोकल्याबरोबरच काळी थुंकी पडणे हे सरसकट लक्षण दिसत नाही. काहींची थुंकी सामान्यदेखील राहू शकते. यापेक्षा वेगळे व्यक्तीला आजारपणात फुफ्फुसामध्ये जडपणादेखील अनुभवास येतो.

कारणे काय?

आपण ज्या वातावरणात काम करतो, तेथे दूषितपणा असेल, तर हा त्रास होऊ शकतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे कोळशाच्या खाणीतील वातावरण दूषित असते. अशावेळी श्वासाच्या माध्यमातून कोळशाची धूळ शरीरात जाते आणि ब्लॅक लंग्ज डिसिजसचा धोका वाढण्याचा धोका राहू शकतो. या स्थितीत शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ही या समस्येचा मुकाबला करण्यासाठी मदत करते आणि शरिरातील धुळीचे कण बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करतात. या प्रक्रियेत सूज येण्याची शक्यतादेखील राहते.

उपचार कोणते?

सुरुवातीला डॉक्टर मौखिक कारणाने उपचार करतात आणि नंतर आजारी व्यक्ती कोणत्या वातावरणात काम करत होता, हे जाणून घेतात. पूर्ण माहिती घेतल्यानंतर रुग्णाच्या छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. या माध्यमातून फुफ्फुसातील सूज, काळे डाग याचा शोध घेतला जातो.

पलोमनरी फंक्शन टेस्टच्या माध्यमातूनही तपासणी करतात. त्याचबरोबर फुफ्फुसाचे कार्यही शोधले जाते.

या आजारावर ठोस असा कोणताही उपचार नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून लक्षणे कमी करण्याबरोबरच फुफ्फुसाचे आरोग्य सुधारण्याचे काम केले जाते. श्वसननलिका स्वच्छ ठेवण्यासाठी औषधाचा आधार घेतला जातो. एखाद्याला अस्थमा असेल, तर इनहेलर मदतीने उपचार केला जातो. एखादा धूम्रपान करत असेल, तर त्याला ही सवय सोडण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा स्थिती कमालीची गंभीर होते तेव्हा लंग ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT