Breathing Technique | वरदान अभिनव श्वसनपद्धतीचे 
आरोग्य

Breathing Technique | वरदान अभिनव श्वसनपद्धतीचे

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भारत लुणावत

आधुनिक जीवनशैलीत वाढलेला मानसिक ताण आणि संगणकासमोर सतत झुकून बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे (पोश्चर) बहुतांश व्यक्ती ‘चेस्ट ब्रीदिंग’ म्हणजेच छातीने उथळ श्वास घेतात. निरोगी शरीरासाठी श्वास पोटापर्यंत (डायफ्रामॅटिक ब्रीदिंग) पोहोचणे आवश्यक असते.

उथळ श्वासामुळे फुफ्फुसांच्या खालच्या भागापर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. फुफ्फुसांचे हे दुर्लक्ष दीर्घकाळ राहिल्यास रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावते आणि कार्बन डायऑक्साइड पूर्णपणे बाहेर टाकला जात नाही. परिणामी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, निद्रानाश, दमा, उच्च रक्तदाब (बीपी) आणि हृदयाचे विकार बळावण्याचा धोका निर्माण होतो. फुफ्फुसांची मूळ कार्यक्षमता दर 10 वर्षांनी सुमारे 10 टक्क्यांनी घटत जाते, असे वैद्यकीय संशोधन सांगते.

तिबेटच्या पर्वतरांगा समुद्रसपाटीपासून अत्यंत उंचावर आहेत, जिथे हवेचा दाब कमी आणि ऑक्सिजन अत्यंत विरळ असतो. सामान्य माणूस या हवेत काही मिनिटांतच धापा टाकू लागतो. मात्र, तिथे राहणारे तिबेटीयन लामा कोणत्याही आधुनिक वैद्यकीय उपचारांशिवाय, दमा किंवा हृदयाच्या आजारांशिवाय कठीण शारीरिक श्रम सहज करतात. त्यांच्या या क्षमतेमागे 800 वर्षांची परंपरा असलेली ‘तुम्मो’ आणि ‘प्राणायाम’ सदृश श्वसन पद्धती आहे. या पद्धतीलाच आधुनिक परिभाषेत ‘तिबेटीयन ब्रीदॉलॉजी’ म्हटले जाते. हे केवळ ध्यान किंवा पूजा नसून फुफ्फुसांच्या स्नायूंना बळकट करणारे एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आहे.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी तिबेटीयन श्वसन पद्धतीवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, या विशिष्ट पद्धतीने श्वास घेतल्यास शरीराची स्वायत्त मज्जासंस्था (ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम) संतुलित होते. दिवसातून केवळ 10 मिनिटे या पद्धतीचा सराव केल्यास शरीरात सकारात्मक बदल घडतात. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पेशींपर्यंत (मायटोकॉन्ड्रिया) ऑक्सिजन वेगाने पोहोचल्यामुळे शरीरातील थकवा दूर होऊन ऊर्जा निर्माण होते. संथ आणि दीर्घ श्वासोच्छवासामुळे ‘कॉर्टिसॉल’ या ताण निर्माण करणार्‍या संप्रेरकाची पातळी घटते आणि मन शांत होते.

2. तुम्मो ब्रीदिंगचे टप्पे

पोटात पूर्ण श्वास भरून घेणे.

ओठांचा चंबू करून वेगाने आणि ताकदीने श्वास बाहेर सोडणे.

श्वास बाहेर सोडताना मध्यपटल (डायफ्रॅम) आत खेचणे आणि ‘पेल्व्हिक फ्लोअर’च्या स्नायूंचे आकुंचन करून काही काळ श्वास रोखून धरणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT