कर्करोग बोलण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वरयंत्रावर परिणाम करतो आणि योग्य वेळी निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. प्रकार स्वरयंत्राच्या वेगवेगळ्या भागांवर अवलंबून या कर्करोगाचे मुख्यतः तीन प्रकार असतात.
• स्वरतारांच्या वरील भागाचा कर्करोग (सुप्राग्लॉटिक कॅन्सर)
• स्वरतारांचा कर्करोग (ग्लॉटिक कॅन्सर)
• स्वरतारांच्या खालील भागाचा कर्करोग
१) धूम्रपान आणि मद्यपान : तंबाखूसेवन आणि मद्यपान यामुळे स्वरयंत्राच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊ शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
२) अपुऱ्या पोषणमूल्यांचा आहार : आहारात जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि कर्करोगाच्या पेशी वाढीस लागतात.
३) प्रदूषण आणि हानिकारक रसायनांचा संपर्क : फॅक्टरीतील धूर, केमिकल्स किंवा प्रक्षित वातावरणात काम करणे हे देखील या कर्करोगाचे कारण ठरू शकते.
४) विशिष्ट विषाणूंचा प्रादुर्भाव : मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) आणि इतर काही विषाणू हे कर्करोग वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. स्वरयंत्राच्या कर्करोगाची लक्षणे या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत; पण पुढील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये: आवाज बदलणे आणि घोगरा पडणे घशात किंवा मानेत गाठ येणे गिळताना त्रास होणे सतत खोकला येणे आणि घशात अडथळा वाटणे श्वास घेताना अडचण येणे आणि दम लागणे घशात जळजळ आणि वेदना होणे वरील लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही विशेष स्कोपी असून, स्वरयंत्रातील हालचाली आणि स्वरयंत्राचा बदल स्पष्ट दिसतो.
• बायोप्सी (ऊतींची तपासणी) कर्करोग आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी संशयित गाठीतील काही ऊतींचे नमुने तपासले जातात
सीटी स्कॅन आणि एमआरआय गाठीचा विस्तार आणि स्थिती तपासण्यासाठी.
एक्स-रे : फुफ्फुस आणि इतर अवयवांवर परिणाम झाला आहे का, हे तपासण्यासाठी. स्वरयंत्राच्या कर्करोगावरील उपचार पद्धती
१) रेडिओथेरपी (किरणोत्सर्ग उपचार) प्रारंभीच्या टप्प्यात रेडिओथेरपी प्रभावी ठरू शकते. यामध्ये उच्च-ऊर्जेच्या किरणांचा वापर करून कर्करोगी पेशी नष्ट केल्या जातात.
२) शस्त्रक्रिया (सर्जरी)
(अ) दुर्बिणीद्वारे केलेली शस्त्रक्रिया : गाठ लहान असेल, तर लेसर तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्बिणीद्वारे काढली जाते. शरीरात कोणताही मोठा काप न करता ही प्रक्रिया केली जाते.
(ब) खुली शस्त्रक्रिया : कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरला असेल, तर स्वरयंत्राचा काही भाग किंवा संपूर्ण स्वरयंत्र काढले जाते. या प्रक्रियेनंतर श्वास घेण्यासाठी घशाला कायमस्वरूपी छिद्र केले जाते.
३) केमोथेरपी (औषधोपचार) औषधांच्या साहाय्याने कर्करोगी पेशी नष्ट केल्या जातात. केमोथेरपी आणि रेडिओथेरपी एकत्र दिल्यास स्वरयंत्र सुरक्षित ठेवण्याची संधी वाढते.
जर कर्करोगामुळे स्वरयंत्र पूर्ण काढावे लागले, तरी काही उपायांद्वारे पुन्हा बोलता येऊ शकते.
इलेक्ट्रॉलॅरिंक्स : एक विशेष उपकरण गळ्याला लावले जाते, ज्यामुळे कृत्रिम आवाज निर्माण होतो. इसोफेजियल स्पीच व्यक्तीला गिळताना हवेशी खेळ करून बोलायला शिकवले जाते.
व्हॉईस प्रोस्थेसिस: विशेष यंत्रणा बसवून आवाज पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो.