मासिक पाळीच्या काळात अनेक महिला सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्सऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरू लागल्या आहेत. हे पर्यावरणपूरक, पुन्हा वापरता येण्याजोगे आणि फायदेशीर आहेत. मात्र, योग्य पद्धतीने न वापरल्यास काही आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.त्या कोणत्या समस्या जाणून घ्या.
एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, एका महिलेने मेन्स्ट्रुअल कपचा चुकीचा वापर केल्यामुळे "युरेटेरोहायड्रोनेफ्रोसिस" हा आजार झाला. हा आजार मूत्रमार्गात अडथळा आल्यामुळे होतो, ज्यामुळे किडनीला सूज येते.
या महिलेला सहा महिने सतत वेदना आणि लघवीत रक्त येण्याची समस्या होती. नंतर डॉक्टरांकडे गेल्यावर समजले की तिचा मासिक पाळीचा कप चुकीच्या ठिकाणी, म्हणजे मूत्रमार्गाजवळ ठेवला गेला होता, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला.
तज्ज्ञांच्या मते, मेन्स्ट्रुअल कप योग्य पद्धतीने न घातल्यास काही समस्या उद्भवू शकतात. मात्र, दुसऱ्या अभ्यासानुसार योग्य वापर केल्यास हे कप सुरक्षित असतात मासिक पाळीमध्ये प्रभावी ठरतात. योग्य स्वच्छता राखल्यास टॉक्सिक शॉक सिंड्रोम (TSS) होण्याचा धोका खूपच कमी असतो.
1. हात स्वच्छ धुवा.
2. कप दुमडून हलक्या हाताने योनीमध्ये घाला.
3. कप योग्य प्रकारे उघडला आहे आणि व्यवस्थित बसला आहे याची खात्री करा.
4. कप टॅम्पॉनच्या किंचित खाली ठेवावा.
5. काढताना कपच्या तळाशी हलकासा दाब देऊन सावकाश बाहेर काढा.
मेन्स्ट्रुअल कप सुरक्षित आहे, पण त्याचा योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो. जर कोणतीही अस्वस्थता वाटली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.