आरोग्य

वंध्यत्वावर होमिओपॅथिक उपचार | पुढारी

Pudhari News

डॉ. सपना गांधी

मुलं होणं व न होणं हे एकट्या स्त्रीवरच अवलंबून नसते तर त्याला पुरुष ही तितकाच कारणीभूत आहे. म्हणजे दोघांपैकी एकात किंवा दोघांच्यातही दोष असू शकतो. ज्याप्रमाणे रिपोर्ट सांगतील त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करून घ्यावे लागतात. पण जर दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असतील तर मग नक्‍कीच मानसिकता विचारात घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्यात शारीरिक दोष नसून मानसिक दोष असू शकतात. 

एक सासूबाई आपल्या थोरल्या सुनेला घेऊन आल्या व म्हणाल्या अहो मॅडम, आमच्या पोराच्या लग्‍नाला सहा वर्षे झालीत पण अजून पाळणा हालला नाही. त्याच्या मागून धाकट्या दोन्ही पोरांची लग्‍न झाली व त्या दोघांनाही 1-1 मुल झालंयसुद्धा, पण या थोरलीला अजून काहीच नाही बघा. समदीकडील मोठ-मोठे दवाखाने पालथे घातले, शिवाय ते डॉक्टर म्हणतील ती त्या सर्व तपासण्या व उपचारही केले. तपासण्यांमध्ये दोघांमध्ये समदं नॉर्मल हाय म्हणतात, तर मग यांना अजून मुल का होत नाही? त्या आजींचा प्रश्‍न खूप गंभीर व नाजूक असाच होता.

मग मी त्या आजींना वंध्यत्व म्हणजे काय, त्याची कारण काय-काय असू  शकतात व त्यावर ओमिओपॅथिक उपचार कसा फायद्याचा होतो हे सर्व सांगायला लागले. सुरुवातीला मुलं होणं व न होणं हे एकट्या स्त्रीवरच अवलंबून नसते तर त्याला पुरुष ही तितकाच कारणभीभूत आहे. म्हणजे दोघांपैकी एकात किंवा दोघांच्यातही दोष असू शकतो. ज्याप्रमाणे रिपोर्ट सांगतील त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करून घ्यावे लागतात. पण जर दोघांचेही रिपोर्ट नॉर्मल असतील तर मग नक्‍कीच मानसिकता विचारात घ्यावी लागते. म्हणजे त्यांच्यात शारीरिक दोष नसून मानसिक दोष असू शकतात. उदा. ताण-तणाव, भीती, चिंता, दडपण, लहानपणी एखाद्या गोष्टींचा धक्‍का होणे, घरातील लोकांच्या त्यांच्यावर अतिधाक असणे, अती हळवा स्वभाव अशी अनेक कारणे प्रेगन्सी राहण्यामध्ये अडथळे आणू शकतात. पण होमिओपॅथिक चिकित्सेत शरीराबरोबर मनाचाही तितकाच खोल अभ्यास केला जातो. त्यामुळे त्या रुग्णातील शारीरिक दोष बरोबर मानसिक दोष निवारण हे होमिओपॅथिक शास्त्र चांगल्या प्रकारे करते.

वंध्यत्व ः जर जोडप्याला लग्‍नाला 1 वर्ष पूर्ण होऊन ही प्रेगन्सी राहात नसेल तर त्याला वंध्यत्व म्हणतात.

अ) स्त्री ः स्त्रियांची मासिक पाळी व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला येणे महत्त्वाचे असते. तसेच अंडाशयातून अंडे परिपक्‍व होऊन पाळीच्या मध्यावर (12 ते 18 दिवसांच्या कालावधीत) योग्य रितीने बाहेर पडणे हे महत्त्वाचे असते. शिवाय ते अंडे व शुक्रबीज यांचे मिलन ही (Fallopian tube)  फोलोपीअन ट्युबमध्ये होऊन ते गर्भाशयाच्या पिशवीमध्ये (Uterus)  आपली जागा घेऊन रुजणे/वाढणे हेही सर्वात महत्त्वाचे असते. शिवाय स्त्री शरीरातील सर्व हार्मोन्सचे संतुलन असणे हेही तेवढेच महत्त्वाचे असते.

ब) पुरुष ः पुरुषांमध्ये (testicles) टेस्टीकल्समध्ये सशक्‍त शुक्रबीज निर्मिती होऊन ती स्त्रीच्या योनीमार्गात (Vagina) प्रवेश होणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.

दोघांच्या वरील क्रियेमध्ये काही दोष असतील तर Pregnancy राहण्यासाठी अडथळे येऊ शकतात. शिवाय त्यांची सर्वसाधारण प्रकृती ही महत्त्वाची आहेच. या दोघांबरोबर चर्चा करून त्यांना इतर ही काही शारीरिक त्रास आहेत का? उदा. डायबेटीस, अ‍ॅनीमिया, थायरॉईड शिवाय लैंगिक क्रियेतील काही अडचणी या गोष्टीही विचारणे किंवा रुग्णांनी मोकळेपणांनी डॉक्टरांना सांगणे हे महत्त्वाचे आहे.

वंध्यत्व दोन प्रकारचे आहे.

1) Primary Sterility : यामध्ये मुल यापूर्वी कधीच राहिलेले नसते. 

2) Secondary Sterility : यामध्ये पूर्वी Pregnancy  राहिलेली असते. (एखादे मुल असते) परंतु त्या जोडप्याला पुढची Pregnancy राहू शकत नाही.

ज्या स्त्रीमध्ये वरचेवर (abortion)  अ‍ॅबॉर्शन होत असतील तर त्यालाही वंध्यत्व (infertility) असे संबोधतात.

वंध्यत्वाची दोघांच्यातील (स्त्री/पुुरुष) कॉमन करणे म्हणजे वय, ताणतणाव, खाणे-पिणे जर खूपच वजन कमी असेल तर किंवा जास्त वजन असेल (Obesity) असेल तरी, स्मोकिंग, दारू, तंबाखू, ड्रग्ज इ. ची सवय असेल तरीही (Pregnancy) मुल राहण्यात अडचण येऊ शकते. वयाचे फार महत्त्व आहे. साधारण 35 वयानंतर पुरुषांमध्ये व 30 वयानंतर स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे उहरपलशी  जास्त आहेत.

वंध्यत्वाची पुरुषांमधील कारणे.

1)(Abnarmal Sperm Production) शुक्राणूची निर्मिती व्यवस्थित न होणे.

2) (Impaired Delivery o Sperm)  शुक्राणू वाहन व्यवस्थित न होणे.

3) (Testosteron Deficiency) टेस्टेस्टेरॉन हार्मोनची कमतरता.

4) (Genetic Defect)  अनुवंशीक दोष

5) (Undescended testes)  टेस्टस ग्रंथी खाली त्यांच्या जागेवर नसणे.

6) (Sexual Problem)  संबंधातील दोष, अडथळे. उदा. लिंग ताठरता नसणे किंवा कमी असणे, शीघ्र वीर्यपतन होणे. (Loss of libido) कामेच्छा कमी असणे इ. अनेक कारणे असू शकतात तर योग्य तपासण्या होणे महत्त्वाचे असते.

पुरुष (Male)  तपासण्या ः सर्वात महत्त्वाचे शारीरिक दोष काही आहेत का हे तपासणी म्हणजे कुठले आजार उदा. डायबेटीस, अ‍ॅनिमिया त्या रुग्णांच्या संबंधाच्या काही सवयी आहेत का? हेही महत्त्वाचे आहे.

1) Semen Analysis

2) Hermon testing

3) Transcrectal scratal Ultrasound.

स्त्री (Female)  तपासण्या ः

1)  Blood Test

2) Cheekin Cervical Mucous by using ovulation test

3) An ultrasound of Overies.

4) Hysterasalphingography हे गर्भाशयाच्या पिशवीत व गर्भवाहन नळीमध्ये काही दोष आहे का पाहण्यासाठी.

5) Laproscopy  अंडाशय, गर्भवाहन नळी व गर्भपिशवीचे काही दोष असतील तर.

दोघांमधील वरील जे काही दोष सापडतील त्याप्रमाणे उपचार करून घ्यावे लागतात. उपचाराची दालने ही बरीच आहेत. कोणी आपल्या कुवतीनुसार, माहितीनुसार  व इच्छेनुसार उपचार करून घेत असतात. त्यामध्ये (Surgery) शस्त्रक्रिया Ovulation drugs, Artificial Reproductive technology (ART) Donar eggs ernbryo, surrogate mother  (भाडोत्री  माता) इ. ट्रिटमेंट पध्दती असू शकतात. पुरुषांमध्ये शुक्रबीजांची संख्या कमी असेल तर हार्मोनल ट्रिटमेंट व शस्त्रक्रिया होऊ शकते.  

वरील ट्रिटमेंट पद्धती या थोड्याफार प्रमाणात त्रासदायक व मनाला न पटणारे Side effects ही होतात.

उदा. उल्टी, मळमळ, डोकेदुखी, वजन वाढणे, सर्वात महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे स्त्रीमध्ये(twin, triplet, a multiplets) जुळं, तिळं व एकाच वेळी अनेक गर्भ एकाच गर्भाशयात वाढायला लागतात. परंतू पुढे त्या गर्भाला व मातेला ही त्यांचे योग्य पोषण करण्यात कमी पडतात व हे दोन्हीही गर्भाला व मातेला त्रासदायकच आहे.

हे सर्व साईड इफेक्टस् टाळायचे असतील तर होमिओपॅथीक चिकित्सा पद्धत की ज्यात अगदी सौम्य-पद्धतीनी आजाराचे मुळच (दोष) मुळापासून काढले जाते. होमिओपॅथीक रुग्णांचा कुठलाही एक ठराविक भाग आजारी किंवा रोगी न मानता त्या रुग्णाचा संपूर्णत: विचार केला जातो. (शाररिक/मानसिक/आहार, आवड-निवड, झोप-स्वप्न, अनुवंशकीता, थंड/उष्ण प्रकृती) इ. आणि मग प्रत्येक रुग्णाचे त्याचे त्याचे प्राकृतीक (Constitusional) औषध दिले जाते. त्यामुळे स्त्री पुरुषांमधील जे जे दोष आहेत ते ते कमी कमी होऊन सर्व हार्मोनल पातळी ही नॉर्मलला आणली जाते. शिवाय होमिओपॅथीक औषधे रुग्णांच्या मधील लैंगिक कार्यकक्षमता ही वाढवते.(Sexual Stamina, sexual drive) त्या त्या ठिकाणी जोडप्यांना मार्गदर्शन करणे ही आवश्यक असते.

खाली काही होमिओपॅथिक औषधे स्त्री-पुरुषांमध्ये उपयोगी पडतील अशी देत आहे. तरी ती योग्य होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉक्टरांकडून घ्यावीत.

* स्त्री वंध्यत्वासाठी : Iodum. conium, bar mur, Nat Mr, sepia, phos,

Bromium, Lyco, causticum plus, Nat C, Borax, Calc-C, Ph-acid, phatian.

* पुरुष वंध्यत्वासाठी : – gnus Castus, lodum, Gelsemum, Fluric aeid, Nat mur, Nit acid, sulph, Lyco, Caladium, Staphysagria, stramonium, Bar-C, platina Ph-acid, phos, conium, Nux-vomica.

1) सेपीया(Sepia) : हे औषध स्त्री-पुरुष दोन्हीमधील वंध्यत्वावर उपयोगी आहे. यातील स्त्री ही उंच, बांधेसुद, प्रेमळ वर्तणुकीची अलिप्तता दाखविणारी असते. गालावर चॉकली जग (वांग) असतो. तिचा योनीमार्ग शुष्क असून तिची कामेच्छा कमी असते. शिवाय तीला संभोगमधील आनंदही घेता येत नाही. पाळीमधील तक्रार म्हणजे खूप स्रावामुळेही वंध्यत्व येते.

2) नॅट्रम कार्ब (Nat Carb) : हे औषध वंध्यत्वासाठी उपयुक्त आहे. त्याचे कारण म्हणजे त्या स्त्रियांच्या योनीचे स्नायू विक असतात. योनी पटकन आकुंचन होते. त्यामुळे वीर्यही तेथे जास्त वेळ राहत नाही. योनी कमकुवत असल्याचे कारण म्हणजे ती स्त्री स्वत: मानसिकद‍ृष्ट्या कमकुवत, सेन्सीटिव्ह व प्रेमळ अशी असते. तीला स्वत: कोणी दुखावलेले सहन होत नाही. ती लगेचच त्या व्यक्‍तीबरोबरचे संबंध तोडून टाकते किंवा त्यांना टाळते. हे रुग्ण उष्ण प्रकृतीचे असून उन्हाचा त्रास होतो. मिठ जास्त आवडते. उलटसुलट खाण्याच्याही तक्रारी असतात.

3) लायकोपेडीअम (Lycopodium) : हे औषध स्त्री-पुरुषांमध्ये दोघांमध्ये उपयुक्‍त आहे. हे उष्ण प्रकृतीचे रुग्ण असून त्यांना गोडाची जास्त आवड असते. लिंग ताठरणे किंवा संभोगाच्या वेळी अर्धवट लिंग ताठरणे, लिंग शिथिलता येणे व थंड पडणे, हातपायाला गोळे येणे यामुळे या रुग्णांचा  आत्मविश्‍वास कमी कमी होऊ लागतो व त्यांचा परिणाम त्यांच्या कामकाजावर, बिझनेसवर होतो. चिडचिडेपणा वाढतो.

स्त्रियांच्या बाबतीत खूपच कामेच्छा असणे, जास्तीकरून पाळीदरम्यान ही भावना वाढते. योनीमार्गातील कोरडेपणावरही हे औषध उपयुक्‍त आहे. अशा प्रकारे होमिओपॅथिक औषधांनी शारीरिक, मानसिक दोष कमी होऊन ते जोडपे आपल्या संसारवेलीवर फुल उमलण्याचा आनंद घेऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT