आरोग्य

आरोग्यासाठी गुणकारी ओवा | पुढारी

Pudhari News

पुढारी ऑनलाईन 

धावपळीच्या जीवनात आपण नेहमी कामाच्या गडबडीत असतो. त्यामुळे आहाराकडे लक्ष दिले जात नाही. सततच्या कामामुळे झोप ही कमी होते. त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामध्ये पोटात गँस होणे, अपचन होणे यावर उपाय म्हणून जसे लिंबू पाणी पिले जाते. तसेच ओवा यावर गुणकारी आहे. ओवाच्या आपण अनेक आजारावर औषधी म्हणून उपयोग करतो. ओवा थोडा कडवट, थोडा तिखट, चवीला आंबट आणि उष्ण असल्याने आपण खाण्यास टाळत असतो. मात्र, ओव्यामुळे शरीरातील वात, कफ कमी करणे, पोटातील वायू कमी करणे, जंत दूर करणे या आजारावर फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.

तसेच ओव्याच्या सेवनाने भूक ही वाढली जाते. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका होते. अ‍ॅसिडिटी, मुळव्याधीचा त्रास असलेल्या रूग्णांनी त्याचे सेवन करू नये. कारण ओव्याने पित्त वाढते. उन्हाळ्यात ओव्याचा वापर करू नये. यासाठी जाणून घेऊयात ओव्याचे फायदे… 

१) पोटात जंतांचा त्रास वारंवार होत असल्यास विड्याच्या पानासोबत ओवा खाल्याने या आजाराचा त्रास कमी होते.

२) छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. 

३) सतत खोकला येत असल्यास ओवा आणि खडीसाखरचे मिश्रण एकत्र करून विड्याच्या पानातून घ्यावे. हे मित्रण दिवसातून तीन वेळा घेतल्यास खोकला थांबण्यास मदत होते. 

४) दात दुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे. किंवा दात दुखत असल्यास ही फायदेशीर आहे.  

५) अपचनामुळे पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करण्यासाठी हे करा. ओव्याला हलक्या शेगडीवरील तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होऊ लागतो.

६) अति पाऊस पडत असतो तेव्हा मधुमेह असणा-या व्यक्तींना वारंवार लघवी होत असते. यावेळी एक चमचा ओवा आणि चार चमचे बेलाच्या पानांचा रसाचे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.त्यामुळे या आजारापासून सुटका होते. 

७) डोकेदुखीचा त्रासावर ही ओवा फायदेशीर आहे. मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो. 

८) ज्या व्यक्तीला दम्याचा त्रास होत असेल त्यांनी ओवा गरम करून घ्या. तो ओवा एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळून थोडाफार दम्याच्या त्रास कमी होईल.  

९) पोट दुखण्याची समस्या निर्माण झाल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. त्यामुळे पोटाच्या समस्या दुर होतात.

१०) चार चमचे ओवा आणि दोन चमचे एरंडेल तेल तव्यावर परतून घ्यावे. आणि त्याची  पुड सांधेदुखी, मुरगळणे, मुकामार लागला असल्यास त्यावर  शेकावे. ही दुखणे बरे होण्यास मदत होते. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT