वजन कमी होत नाहीये? कारण तुमच्या स्वयंपाकघरातच 'हेल्दी' दिसणारे पॅकेटबंद पदार्थच आहेत आरोग्याचे शत्रू Pudhari File Photo
आरोग्य

वजन कमी होत नाहीये? कारण तुमच्या स्वयंपाकघरातच 'हेल्दी' दिसणारे पॅकेटबंद पदार्थच आहेत आरोग्याचे शत्रू

पुढारी वृत्तसेवा

तुम्ही वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करत आहात; पण मनासारखे परिणाम मिळत नाहीत? याचे कारण बाजारातील पॅकेटबंद पदार्थांमध्ये लपलेले असू शकते. ‘आरोग्यदायी’ किंवा ‘हेल्दी’ समजले जाणारे अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ टाळल्यास, तुमचे वजन आणि शरीरातील चरबी दुप्पट वेगाने कमी होऊ शकते! अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ टाळल्यास वजन घटवण्याचा वेग दुप्पट होतो. ‘होलग्रेन यिल’, ‘प्रोटिन बार’सारखे पदार्थही वजन कमी करण्यात अडथळा आणतात.

हे पदार्थ धोकादायक का?

व्यसनाधीन : हे पदार्थ केवळ पौष्टिकद़ृष्ट्या निकृष्ट नसतात, तर ते जैविक आणि वर्तणुकीशी संबंधित व्यसन लावू शकतात. यामुळे तुम्हाला भूकेवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.

पोषकतत्त्वांची कमतरता : प्रक्रियेदरम्यान यातील नैसर्गिक पोषकतत्त्वे नष्ट होतात आणि कृत्रिम घटक टाकले जातात.

अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड म्हणजे काय?

हे असे पदार्थ आहेत, ज्यांवर खूप जास्त प्रक्रिया केलेली असते आणि त्यात साखर, मीठ व चरबी यांचे प्रमाण प्रचंड असते.

उदाहरणे : इन्स्टंट नूडल्स, बिस्किटे, चिप्स, पॅकेटबंद स्नॅक्स, प्रक्रिया केलेले मांस, आणि गोड पेये.

तुमच्यासाठी संदेश

* पॅकेटवरील ‘हेल्दी’, ‘डायट’, ‘लो-फॅट’ यांसारख्या शब्दांना भुलू नका.

* शक्यतोवर नैसर्गिक आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ (उदा. फळे, भाज्या, धान्य, डाळी) निवडा.

* तुमचे आरोग्य तुमच्या हातात आहे. पॅकेट उघडण्यापूर्वी विचार करा!

भारतातील भयावह वास्तव!

* भारतात अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांचा वापर 53 पटीने वाढला आहे.

* याच काळात देशातील लठ्ठपणाचे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. हा निव्वळ योगायोग नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT