Health Care : शरिरात उष्णता वाढलीय? मग हे ‘सहा’ घरगुती उपाय करा Health Care
आरोग्य

Health Care : शरिरात उष्णता वाढलीय? मग हे ‘सहा’ घरगुती उपाय करा

शरिरात उष्णता वाढलीय? मग हे ‘सहा’ घरगुती उपाय करा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उन्हाळा आला की आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उदभवणारा उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास. (Health Care) शरिरात उष्णता वाढून काहींना छातीतील जळजळ, अंगावर छोटे-छोटे पुरळ उठणे, डोळ्यात जळजळ होणे, मूत्रविसर्जन वा मलविसर्जन करताना दाह, तोंड येणे, तळपायाची आग होणे असे बरेच त्रास उष्णतेमुळे जाणवायला लागतात. याचा त्रास आपल्याला बरेच दिवस होत असेल आणि जर का तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर याचे मोठ्या आजारात किंवा रोगात रुपांतर होवू शकते. मग हा त्रास नको असेल तर हे 'सहा' घरगुती उपाय करा आणि काही दिवसांतच करा उष्णतेवर मात.

उष्णतेवर हे 'सहा' घरगुती उपाय

मनुका

मनुका साधारणत: १०० ग्रॅम घेवून त्या रात्री कोमट पाण्यात भिजत ठेवाव्यात. सकाळी या भिजलेल्या मनुका चावून चावून खाव्यात आणि ते पाणी सुध्दा पिऊन टाकावे.

ताक प्या

ताक पिणे हा एक पर्याय आहे जो उष्णता कमी करते. उष्णतेमुळे थकल्यासारखे वाटतं असेल (Health Care) तर ताकाने एनर्जी येते. पण हे ताक कधी प्यावे हेही आपल्याला माहीत असावे. रोज दुपारी ताक प्यावे. रात्रीचे ताक शक्यतो पिऊ नये.

जिरे पाणी

आपल्या स्वंयपाक घरातील महत्वाच्या मसाल्यापैकी एक म्हणजे जिरे. या जिऱ्याचे विविध पदार्थात आपण वापर करतो. त्याचबरोबर आणि जिरे विविध आजारावर सुध्दा परिमाणकारक असतात. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल तर तुम्ही नक्की जिरे पाणी प्या. रात्री एक ग्लास पाण्यात जिरे भिजत ठेवावे आणि सकाळी ते जिरे पाणी सेवन करावे. यामुळे उष्णता पण कमी होतेच आणि वजनदेखील नियंत्रणात राहते.

भरपूर पाणी प्या

उन्हाळ्यात भरपुर पाणी पिणे गरजेचे असते. भरपूर म्हणजे फक्त पाणी पितचं राहणे नव्हे तर जेव्हा-जेव्हा तहान लागेल तेव्हा टाळाटाळ न करता पाणी पिणे. शक्यतो फ्रिजमधील पाणी पिणे टाळावे. (Health Care)

कोकम सरबत

कोकम सरबतही उष्णतेवर गुणकारी आहे. कोकम पाण्यात किमान अर्धा तास भिजत ठेवा. यात साखर, चवीपुरते काळे मीठ आणि जिरेपुड टाकुन एकजीव करून घ्या आणि सेवन करुन घ्या.

सब्जाचे सेवन

उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना उष्णतेचा त्रास होत असतो. सब्जाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा थोडं मोठ्या आकाराचे व करड्या रंगाचे असते. सब्जा पाण्यात घातल्यावर फुगते. हे सब्जाचे पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी करते. जर का तुम्ही सब्जाचे बी पाणी दुधातून किंवा सरबतातून घेतल्यास उष्णतेचे विकार लवकर बरे होतात.

(टीप- वरील दिलेले उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावेत)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT