आरोग्य

Benefits of Partner Hug : जोडीदाराच्या मिठीत झोपण्याचे आरोग्यदायी फायदे

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पार्टनरची साथ किती महत्त्वाची असते. त्याचे आपल्यासोबत असणे, साथीदारासाठी खूपच मोठी बाब असते. फक्त त्याचं/तिचं तुमच्यासोबत असणं हेदेखील आनंदाची गोष्ट असते. ( (Benefits of Partner Hug)) पार्टनरसोबत टाईम स्पेंड करताना एकमेकांना हग करणं, हा आनंदाचा एक भागचं आहे. तसं म्हटलं तर मिठी मारण्याचे अनेक फायदे आहेत. पार्टनरला हग करण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का? (Benefits of Partner Hug)

तणावाला दूर पळवा

तुमची काळजी करणाऱ्यांना जेव्हा तुम्ही मिठी मारता तेव्हा तुमच्या शरीरात oxytocin हे हार्मोन स्त्रवते. तुमचा ताण कमी करण्यासाठी हे हार्मोन फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही हसता, तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता. हे हार्मोन तुमचा रक्तदाब नियंत्रणात आणण्याासाठी आणि "तणाव संप्रेरक" कॉर्टिसोलची पातळी कमी करू शकते. जे तुमचा ताण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

हृदयासाठी फायदेशीर

जर तुमचा बीपी लो आहे आणि तुम्हाला तणाव कमी करायचं असेल तर हग करा. संशोधकांचं म्हणणं आहे, महिलांना हग करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पण, महिला आणि पुरुष दोघांनाही हे लागू पडते.

वेदना कमी करण्यासाठी 

एक चांगली मिठी हे तुमच्या वेदना कमी करते. oxytocin हे हार्मोन तुमच्या वेदना कमी करण्याचे संकेत देतात. यावर डॉक्टरांचे संशोधन सुरु आहे.

Sick woman blowing her nose, she covered with blanket

ज्या लोकांवर तुम्ही विश्वास करता त्यांना मिठी मारणं हे सामान्य व्हायरसपासून तुम्हाला वाचवू शकतो. खासकरून, तुम्ही जर खूप तणावात असाल तर अधिक हग केल्याने तुम्ही वाचू शकता.

पार्टनरशी कनेक्ट राहण्यासाठी

ऑक्सीटोसिनला कधी-कधी "लव्ह हार्मोन" म्हटलं जातं – जर तुम्ही तुमच्या पार्टनरला हग केला तर ऑक्सीटोन अधिक स्त्रवते, म्हणून तर यास लव्ह हार्मोन म्हटलं जातं. जे हग करता, किस करतात त्यांचे आरोग्य चांगलं राहतं आणि कमी तणावग्रस्त राहतात.

चांगल्या झोपेसाठी फायदेशीर

ऑक्सीटोसिन जादुई आहे. चांगल्या झोपेसाठी फायदेशीर आहे. या हार्मोनची अशा स्थितीत निर्मिती झाली तर रात्री गाढ आणि उत्तम झोपेसाठी हे खूपचं फायदेशीर ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT