आरोग्य

गाऊटचा आजार आणि होमिओपॅथिक उपचार

Pudhari News

डॉ. सौ. सपना गांधी

संधिवातातील अनेक प्रकारांमधील एक प्रकार म्हणजे गाऊट. गाऊट म्हणजे नेमके काय? त्याची कारणे काय काय आहेत? त्याची लक्षणे कशी असतात व त्याला होमिओपॅथिक उपचार काय आहेत?

गाऊट म्हणजे अंगठ्याचा संधिवात, शरीरातील मूत्रपिंडाचे कार्य बिघडले की जे काही युरिक अ‍ॅसिड मूत्रावाटे बाहेर टाकण्याचे काम मूत्रपिंड करीत असते, त्याच्यावर परिणाम होऊन पूर्णपणे युरिक अ‍ॅसिड लघवीवाटे बाहेर टाकले जात नाही व या युरिक अ‍ॅसिडचे रक्तातील प्रमाणात वाढ होते, रक्तातील युरिक अ‍ॅसिडची नियमित पातळी 3.4 ास%  या दरम्यान असते. या पातळीपेक्षा रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास त्याचे एकावर एक थर साचून खडे तयार होतात. हे खडे मुख्यत्वे पायाच्या अंगठ्याच्या सांधात व गुडघ्यात जास्त प्रमाणात होतात व त्या जागी भयंकर वेदना होतात, सांधा सुजतो, त्यावरील त्वचा लाल व चकचकीत दिसते. वेदनेचे प्रमाण इतके असते की रुग्णाला पायमोजाचा स्पर्शही सहन होत नाही व कसला इतरही जरासा स्पर्श चालत नाही. हा त्रास अचानक सुरू होतो, कधी कधी दोन दिवस तर कधी आठवड्यापर्यंत हा त्रास होऊ शकतो. याला अ‍ॅक्युट अ‍ॅटॅक म्हणतात.

त्यानंतर रुग्ण पूर्वपदावर येतो. पायाच्या अंगठ्याच्या सांध्याशिवाय घोटे, मनगट, कोपर इ. सांध्यामध्येही असे खडे साचून राहून त्रास होऊ शकतो. काही जणांमध्ये हा पुन्हा दुसर्‍यांदा त्रास उद्भवतच नाही. परंतु, काही जणांना मात्र वर्षभराच्या आतच परत अशा प्रकारचा त्रास होतो. परत परत होणार्‍या त्रासामुले सांद्याची झिज होऊन, सांधे लवकर खराब होता. त्यामुळे वेदना दीर्घकाळ राहू शकते.

गाऊट हा पुरुषांमध्येच जास्त प्रमाणात दिसू लागतो. सहजा स्त्री व मुले यांच्यात जास्त आढळून येत नाही. (पण याला अपवाद म्हणजे Secondary Gaut आहे.) काही रुग्णांमध्ये चयापचयातील बिघाडामुळे युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. तर काहींच्यात अनुवंशिक दोष येतात.

1)  Primary Gaut :-  या प्रकारामध्ये रुग्णाच्या शरीरातच जास्त युरिक अ‍ॅसिड तयार होते. हा प्रकार फक्त पुरुषांमध्येच आढळतो. वयाच्या 20 ते 40 वर्षांमध्ये होतो.

2) Secondary Gaut  :-  काही विशिष्ट औषधांच्या साईड इफेक्टस्मुळे किडनीची युरिक अ‍ॅसिड उत्सर्जीत करण्याची क्षमता कमी होते. हा प्रकार 60-65 वर्षे, वयोवृद्धांमध्ये, स्त्रीयांमध्ये होऊ शकतो.  शक्यतो मांसाहार करणार्‍या, चरबीयुक्त अती खाणार्‍या, आरामदायी बैठे जीवन जगणार्‍यांच्यात या प्रकारचा आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

लक्षणे :- भयंकर वेदना होतात,  सुज येते, लाल होते, बोटे वाकडीतिकडी होतात, बोटे वळण्यास त्रास होतो, सांधे आकडतात, उठण्या-बसण्यात त्रास होतो.

गाऊटची तपासणी ही रक्तातील युरिक अ‍ॅसिडची तपासणी महत्त्वाची ठरते. तसेच, किडनीची कार्यक्षमता बघण्यासाठी रक्तातील युरिक व क्रियाटिनीन या तपासण्याही महत्त्वाच्या ठरतात. याशिवाय सांध्यांची झीज कितपत झाली आहे, यासाठी सांध्यांची क्ष किरण तपासणी आवश्यक ठरते.

प्रत्येक गाऊटच्या रुग्णाला ठरावीक होमिओपॅथिक औषधे उपयोगी पडतातच असे नाही तर प्रत्येक रुग्ण हा दुसर्‍या रुग्णापेक्षा भिन्न असतोे. 

काही होमिओपॅथिक औषधे :

1) अर्टीका युरेन्स :- या प्रकारातील रुग्णांच्या शरीरात युरिक अ‍ॅसिड अतिशय तयार करण्याची प्रवृत्ती असते. याचबरोबर पित्त उसळल्यासारखे अंगावर गांधी उठू लागतात, खाज सुटू लागते, रुग्ण थुलथुलीत, संथ, जास्त भूक असणारा, चेहर्‍यावर फिकट झाक असणारा,  तसेच सांधे, कंबर दुखण्याची, गांधी उठण्याची प्रवृत्ती असणारा असतो.

2) लेडम पाल :- हे औषध संधिवाताबरोबर, अंगठ्याच्या वेदनांसाठी उपयुक्त आहेत. पायाचा अंगठा दुखरा, सुजलेला, गरम वाटणारे सांधे, ओढल्याप्रमाणे सांधे, उष्णतेने दाब दिलेले व हालचालीने वाढते, वेदना खालील सांध्यापासून वरच्या दिशेने वाढतात. सांध्यामध्ये बदल होऊन वेडेवाकडे होतात, ताठरता, कडक बनतात (टॉकी), गुडघ्यामध्ये, अंगुलीवातामध्ये उपयोगी पडतात, बिछान्याची उबही सहन होत नाही. सांध्यांमध्ये करकर आवाज होते, दुखतात, थंड स्पर्शाने बरे वाटते, रुग्ण चिडचिडा, अस्वस्थ व लटपटत असतो. 

3) बेन्झॉईक अ‍ॅसिड : शारीरिक फरकांना ठीक करण्यासाठी उपयोगी, चयापचयाच्या क्रियेवरही या औषधाचा चांगला परिणाम होतो, लघवी साफ होत नसेल तर, दीर्घकाळ लघवीला वास येणे हे या औषधांनी बदलतात, उदासिनता आदी अनेक औषधे वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वापरली जातात. वरील औषधे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT