आरोग्य

Fat Control : चरबीवर नियंत्रण ठेवताना…

मोहन कारंडे

डॉ. संतोष काळे

वजन वाढणे हे चरबी वाढल्याचे लक्षण असते. त्यामुळे चरबीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. शरीरातील चरबी वाढली, तर अनेक रोगांना आपोआप आमंत्रण मिळते. चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा जाणवतो आणि आपल्याला आपलीच लाज वाटते. यासाठी चरबीवर समतोल ठेवणे आवश्यक असल्याने वेळोवेळी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य होईल.

शरीराचे वजन कमी केल्यास त्याचा परिणाम हा हाडे, मासपेशी, आतडे व शरीरातील पाण्याच्या पातळीवर होतो. त्यामुळे वजन किती असावे याचा विचार करून आपला आहार ठेवावा. वजनासंबंधी सतत दक्ष राहिले पाहिजे. यासाठी आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. वजन वाढले असेल, तर तत्काळ ते कमी करण्याचा प्रयत्न करू नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन टप्प्याटप्प्याने वजन कमी केले पाहिजे. जास्त वजन वाढले असेल, तर धाप लागणे, थकवा व अस्वस्थपणा जाणवतो.

तसेच वजन जास्त प्रमाणात कमी केले, तर त्यांचा विपरीत परिणामही जाणवतो आणि सतत घाम येणे, पायांना गोळे येणे, थकवा जाणवणे आणि कंबर, पाठदुःखीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य प्रमाणात ठेवावे. चरबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम करावा. त्यानंतर लगेच नाश्ता करू नये. त्यासाठी थोडा कालावधी जाऊ द्यावा. त्यानंतर हलकासा आहार घ्यावा. जेवल्यानंतर लगेच धावपळ करू नये. वजन कमी करण्यासाठी आपल्या मनाने कोणतेही प्रयोग करू नयेत. कारण, शरीरातील अंतर्गत क्रियांची आपल्याला माहिती नसते. आपल्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या उपाय योजनेमुळे शरीरातील मासपेशी, रक्तभिसरण क्रिया, पाण्याची पातळी कमी-जास्त होणे तसेच हाडांवरही परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी करण्याचा निर्णय तत्काळ घेऊ नये.

आपल्या गैरसमजुतीने आपण वजन वाढले असे समजत असतो. तसे काही होत नसते, तर शरीरातील चरबीचे प्रमाण वाढल्याने आपले वजन वाढते. वास्तविक चरबीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एकाच वेळेस जास्त आहार घेतला आणि त्या प्रमाणात काम किंवा श्रम केले नाही, तर तेवढी ऊर्जा बाहेर फेकली जाणार नाही आणि पौष्टिक आहारामुळे चरबी वाढण्याचा धोका वाढतो. त्यासाठी एकाच वेळी जास्त अन्न न खाता दिवसातून दोन-चार वेळा थोडे थोडे अन्न ग्रहण केले पाहिजे.

मानवी शरीराला दररोज दीड हजार कॅलरीज आवश्यक असतात. त्यापेक्षा जास्त कॅलरीज शरीरात जमा झाल्यास ते चरबीच्या रूपाने साठविले जाते. ही चरबी मानवी शरीराला घातक ठरू शकते. पाय, मांड्या, हात, पाठ इत्यादी अवयव दुःखू लागतात. शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या, तर हृदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आहारात पाले व फळभाज्या असाव्यात. तेलकट पदार्थ जास्त खाऊ नयेत. जास्त प्रोटिन वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच चालण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. दररोज नियमित व्यायाम करावा. यामुळे शरीरातील चरबी वाढणार नाही. याकडे दुर्लक्ष केले, तर चरबीचे प्रमाण वाढेल आणि पर्यायाने लठ्ठपणाही वाढेल. चरबी कमी करण्याच्या प्रयत्नात आपल्या शरीरातील अंतर्गत क्रियेवरही विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.

स्लीम बॉडीचे वेड आजकाल तरुणांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये वाढले आहे. परंतु, त्याने हाडे ठिसूळ होतात आणि अनेक रोगांना आमंत्रण मिळते. त्यामुळे योग्य आहार घेऊन चरबीवर नियंत्रण ठेवले, तर आपले शरीरही सुंदर दिसेल. उंचीच्या प्रमाणात आपल्या शरीराचे वजन असणे आवश्यक आहे. उंची जास्त असेल आणि वजन कमी असेल, तर हाडे दिसू लागतात. उंची कमी असेल आणि वजन जास्त असेल, तर लठ्ठपणा तत्काळ दिसतो.

त्यामुळे वजन आणि उंची यांचा समतोल ठेवला पाहिजे. जास्त चरबीचा त्रास हा रक्तवाहिन्या, हाडे, मासपेशी यांच्यावर होतो. त्यामुळे शरीराचे कार्य बिघडते. परिणामी, अपचन होणे, जास्त भूक लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, सुस्तपणा येणे अशा समस्या उद्भवतात. स्वस्थ शरीरासाठी अतिरिक्त चरबी ही घातक आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी वेळोवेळी वजन तपासणे, आहारात बदल करणे आवश्यक आहे. तसेच फास्टफूड खाण्याचे शक्यतो टाळावे. त्यामुळे शरीरातील चरबी वाढणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT