Exercise Before Sleep | झोपण्यापूर्वी करावयाचा व्यायाम File photo
आरोग्य

Exercise Before Sleep | झोपण्यापूर्वी करावयाचा व्यायाम

पुढारी वृत्तसेवा

लीमा महाजन

निरोगी राहण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दररोज पाच ते दहा मिनिटे भिंतीचा आधार घेऊन पाय वर करून झोपलात तर त्याचे शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. या साध्या स्थितीमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम शांतपणे जमिनीवर किंवा बेडवर झोपा आणि तुमचे दोन्ही पाय भिंतीचा आधार घेऊन वरच्या बाजूला सरळ करा. तुमचे नितंब भिंतीपासून थोडे मागे ठेवा जेणेकरून तुम्हाला आरामदायक वाटेल. नाकाने हळूहळू श्वास घ्या आणि शरीर पूर्णपणे शिथिल सोडा. शरीरावर कोणताही ताण किंवा जोर देऊ नका. हे आसन जेवणानंतर किमान दोन ते तीन तासांनी करावे आणि या पाच ते दहा मिनिटांच्या काळात मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळावा.

तुम्ही दररोज असे केले तर तुमच्या पायांची सूज आणि वेदना कमी होतात. यामुळे मज्जासंस्था शांत होते ज्यामुळे चांगली झोप लागते आणि शरीरातील कोर्टिसोल म्हणजेच तणाव निर्माण करणार्‍या संप्रेरकाची पातळी कमी होते. या स्थितीमुळे ओटीपोटाच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो ज्याचा सकारात्मक परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो. तसेच मासिक पाळीतील सौम्य वेदनांपासूनही आराम मिळू शकतो. हे आसन कंबरदुखीवर रामबाण उपाय ठरू शकते. ज्यांना अनियंत्रित उच्च रक्तदाब ग्लुकोमा आहे त्यांनी हे आसन टाळावे. तसेच वारंवार चक्कर येण्याची तक्रार असणार्‍यांनी ही स्थिती टाळणे हिताचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT