दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलची गरज अत्यावश्यक असली तरी याचे धोकेही जास्त आहेत. मोबाईलवरून माहितीचा खजिना मिळत असल्याने हँडसेट जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तथापि, नव्या संशोधनातून मोबाईलच्या अतिवापरामुळे हार्टअटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडातील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ एल्सेव्हिएर यांच्या शोधनिबंधामध्ये हा दावा करण्यात आला आहे.
सलग अर्ध्या तासाहून (३० मिनिटे) अधिक मोबाईलचा वापर केल्यास हृदयविकाराचा त्रास होण्याची दाट शक्यता असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे.
पाच मिनिटांपासून ते २९ मिनिटांपर्यंत मोबाईलचा वापर केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता तीन टक्क्यांनी संभवते, असे या संशोधनात नमूद केले आहे.
४,४४,०२७ ब्रिटनमधील ४ लाख ४४ हजार २७ जणांची चाचणी घेऊन हा संशोधन अहवाल तयार करण्यात आला होता. मोबाईलच्या वापराआधी यातील एकालाही रक्तदाबाचा त्रास नव्हता.
चाचणी केलेल्या लोकांपैकी बहुतेकजणांना १२.३ वर्षांत हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता. यापैकी अनेक जणांचा हार्टअटॅकने मृत्यूही झाल्याचे सरकारी डाटातून स्पष्ट झाले आहे.
मधुमेह, धूम्रपान घातक : नियमित मोबाईलचा वापर करणाऱ्यांनाही हृदयविकाराचा धोका संभवतो. मधुमेह अथवा धूम्रपान करीत असणाऱ्या हृदयविकाराचा धक्का बसण्याची शक्यता अधिक असते.
मानसिक तणाव, कमी झोप : कमी झोप, मानसिक तणाव, मनोविकाराची समस्या असणाऱ्यांनाही मोबाईलच्या अतिवापराने हार्टअटॅकचा धोका जाणवत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. नियमित मोबाईल वापरणाऱ्यांना मोबाईल न वापणाऱ्यांच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
अचूक उपायांची गरज : मोबाईलचा कसा आणि किती वेळ वापर करायचा याबाबत अचूक उपाययोजना शोधण्याची गरज आहे. अशी सूचनाही या संशोधनात केली आहे.